Salary stopped for 3,000 Solapur teachers, raising concerns for 1.5 lakh teachers statewide. saam tv
महाराष्ट्र

Teacher Salary: दीड लाख शिक्षकांवर टांगती तलवार; सोलापूरच्या ३ हजार शिक्षकांचा पगार थांबणार! काय आहे कारण ?

Maharashtra Teachers Salary Crisis: सोलापूरच्या 3 हजार शिक्षकांचा पगार थांबवण्यात आलाय. मात्र यामुळे राज्यातल्या दीड लाख शिक्षकांचं टेंशन वाढलंय.नेमकं काय झालंय? शिक्षकांच्या पगारावर टांगती तलवार कशामुळे आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • सोलापूर जिल्ह्यातील ३ हजार शिक्षकांचा पगार थांबवण्यात आला.

  • शालार्थ आयडीमध्ये बोगसगिरी आणि अपूर्ण कागदपत्रं अपलोड न करणं हे कारण ठरलं.

  • या कारवाईमुळे राज्यातील दीड लाख शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

शालार्थ आयडीतील बोगसगिरी विरोधात शिक्षण विभागाने सुरु केलेल्या शोध मोहीममुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलंय. कारण मुदतीत कागदपत्रं अपलोड न करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील 3 हजार शिक्षकांचा पगार थांबवण्यात येणार आहे. तसे आदेशच वेतन अधीक्षकांनी दिलेत. शिक्षकांचं वेतन का थांबवलं ते पाहूयात.

राज्यभरातील खासगी, अनुदानित आणि सरकारी शाळांमध्ये साडेचार लाख शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. यात नोव्हेंबर 2012 ते ऑगस्ट 2025 दरम्यान मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन कागदपत्रं अपलोड करण्याचे आदेश दिले होते. यात वैयक्तिक मान्यता, रुजू अहवाल, नियुक्ती आदेश यासोबतच शालार्थ आयडीची माहितीचा समावेश होता. मात्र अनेक शिक्षकांनी माहिती अपलोड न केल्याने 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

मात्र मुदत वाढवूनही शिक्षकांनी ऑनलाईन कागदपत्रं अपलोड केले नाहीत. त्यामुळे त्यांचे पगार थांबवण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी मुख्याध्यापकांना दिलेत. दरम्यान सोलापूरमधील जिल्ह्यातील शाळांची नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात. सोलापूर जिल्ह्यात एकूण 989 खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा असून 15 हजार 296 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आहेत. त्यापैकी एकूण 221 शाळांनी शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे कागदपत्रं अपलोड केलेले नाहीत. त्यामुळे कागदपत्रे अपलोड न केलेल्या 3089 शिक्षकांचे पगार थांबणार आहेत.दरम्यान कर्मचाऱ्यांचे कागदपत्र अपलोड न केल्यामुळे मुख्याध्यापकांचेही पगार थांबवणार असल्याची माहिती वेतन अधीक्षकांनी दिलीय.

शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना ही आक्रमक झाल्यात. शिक्षकांना वारंवार वेठीस धरण्याचे कारण काय? मुदतवाढ द्या अन्यथा आंदोलन करू, असा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. एकीकडे सुप्रीम कोर्टानं 2000 नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करा अन्यथा निवृत्तीचा पर्याय दिलाय. तर दुसरीकडे मुदतीत कागदपत्रं अपलोड न केल्याने शिक्षकांचे पगार थांबणार आहेत. त्यामुळे राज्यातील दीड लाख शिक्षक दुहेरी संकटात सापडलेत. त्यामुळे कागदपत्रं अपलोड करण्यासाठी शिक्षकांना आणखी मुदतवाढ मिळाणार की थेट पगार थांबणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT