Teachers monitor stray dogs inside a school campus after Amravati Education Department issues a controversial order assigning them surveillance responsibility. Saam Tv
महाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर, भटक्या कुत्र्यांवर शिक्षक ठेवणार ‘पाळत’?

Amravati Education Department: भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी एक नवा फतवा काढलाय. शिक्षकांना आता शाळेत शिकवण्या ऐवजी कुत्र्यांच्या मागं-मागं फिरावं लागणार आहे. हा अजब फतवा कोणी काढलाय ? ही बौद्धीक दिवाळखोरी कशासाठी ?

Suprim Maskar

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय... भटक्या कुत्र्यांचे हल्ले आणि कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबिज होऊन मृत्यूच्या घटनांमध्येही वाढ झालीय... भटक्या कुत्र्यांकडून लहान मुलांना अनेकदा लक्ष्य केलं जातंय... याची दखल घेत शाळेच्या आवारातील भटक्या कुत्र्यांवर पाळत ठेवली जाणार आहे, पण याची जबाबदारी चक्क शिक्षकांवरच सोपवण्यात आलीय... भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त शिक्षकांनी करावा हा अजब फतवा अमरावती महापालिकेच्या शिक्षण विभागाने जारी केलाय... नेमका हा फतवा काय आहे?

भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर

शाळेच्या आवारात भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी

कुत्र्यांच्या व्य़वस्थापनाची आणि तपासणी यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी शिक्षकांकडे

शाळेत शिक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या नावाखाली शिक्षण विभागाचा नवा प्रयोग

अमरावती महापालिकेच्या शिक्षण विभागानं हा अजब फतवा काढल्यानं प्रहारचे बच्चू कडू आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांनी सरकारवर हल्लाबोल केलाय...

देशातील अनेक भागात कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त आहेत...अशातच दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्यानं सरकारी शाळांमधील शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याचं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम सोपवण्यात आलंय.. छत्तीसगडमध्येही शिक्षकांना ही जबाबदारी देण्यात आलीय...अशातच अमरावती महापालिकेनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन शिक्षकांच्या माथी नवी जबाबदारी मारल्यानं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं बाळकडू द्यायचं की भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी योजना आखायच्या? असा प्रश्न उपस्थित होतोय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT