Teachers And Graduate Constituency Election Result Saam Tv
महाराष्ट्र

MLC Election Result: शिक्षक- पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाची बाजी; सर्व जागांचे निकाल जाहीर, महायुतीला पुन्हा दणका

Teachers And Graduate Constituency Election Result : नाशिक, कोकण, मुंबईमधील ४ जागांसाठी झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारलीय. अनिल परब, ज. मो. अभ्यंकर यांचा विजय झालाय.

Bharat Jadhav

लोकसभेनंतर ठाकरे गटाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही महायुतीला दणका दिलाय. नाशिक, कोकण आणि मुंबई येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारलीय. मुंबईच्या पदवीधर मतदारसंघात अनिल परब आणि शिक्षक मतदारसंघात ज. मो. अभ्यंकर हे विजयी झालेत. तर नाशिक शिक्षक मतदारसंघातही ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांचाही विजय जळवपास निश्चित मानला जात आहे.

तर कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे हे विजयी झालेत. ठाण्यात त्यांच्या घराचा खाली कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच कार्यकत्यांनी जल्लोष केला. निरंजन डावखरे यांचा स्वभाव त्याचं काम , गेली 12 वर्ष लोकांमध्ये लोकसंपर्क, सरकार असताना सरकार नसताना त्यांनी सर्व विषयांना प्राधान्य देऊन त्यांनी न्याय दिला त्याचबरोबर या संपूर्ण मतदारसंघांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण या भागामध्ये केली सेवा ती प्रत्येकाला माहित आहे. चांगला उमेदवार उभा राहतो तेव्हा प्रत्येक जनाला वाटते हा निवडून यावा म्हणून भरघोस मतांनी निरंजन डावखरे यांचा विजय झालाय, असं रविंद्र चव्हाण म्हणाले.

तर आपल्या विजयावर बोलतांना निरंजन डावखरे म्हणाले, या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने हॅट्ट्रिक करत असतानाही पूर्ण ताकद महायुतीच्या कार्यकर्त्यांची आहे. ज्या ज्या शिक्षक संघटना ज्यांनी आम्हाला समर्थन दिलं आणि त्यांनी पूर्ण ताकद येथे उभी केली. रविंद्र चव्हाण यांच्या हाताला गुण आहे, अशीच प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे. त्यामुळे चांगले यश मिळाले. सर्व घटक पक्षांनी चांगले काम केल्याचं निरंजन म्हणाले

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण २८ टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६७ हजार ६४४ मतदारांनी मतदान केले होतं. त्यापैकी ६४ हजार २२२ मते वैध ठरली तर ३ हजार ४२२ मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी ३२ हजार ११२ इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

पहिल्या पसंतीची ४४ हजार ७८४ मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड. अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केलं.

मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब यांचा 26 हजार मतांनी विजय झाला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत होती. मतदारांनी भाजपला नाकारलं असून उद्धव ठाकरेंवर पुन्हा विश्वास व्यक्त केल्याची प्रतिक्रिया वरून सरदेसाई यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT