Nashik Latest News
Nashik Latest News Saam TV
महाराष्ट्र

पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; मासिक पाळी आलेल्या विद्यार्थीनीला वृक्षारोपण करण्यापासून रोखलं

अभिजित सोनावणे

नाशिक : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी नाशिकमधून समोर आली आहे. मासिक पाळी आली म्हणून एका महाविद्यालयीन तरुणीला वृक्षारोपण करण्यापासून रोखल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. प्राप्त माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरच्या देवगाव आदिवासी आश्रमशाळेतील हा संतापजनक प्रकार घडला आहे. (Nashik Latest News)

मासिक पाळी आलेल्या मुलीने झाड लावले तर ते झाड जळतं. असा अजब तर्क शिक्षकांनी लावला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने आदिवासी विकास विभागाकडे तक्रार देखील केली आहे. हा संपूर्ण प्रकार समोर येताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, मागील सदरील घटना ही मागील आठवड्यात घडली आहे. त्र्यंबकेश्वरच्या येथील देवगावच्या आदिवासी आश्रमशाळेत वृक्षारोपण सुरू होतं. यावेळी 10 मुलींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार होतं. तेव्हा शिक्षकांनी वृक्षारोपन करणाऱ्या 10 पैकी मासिक पाळी असलेल्या विद्यार्थिनीला बाहेर काढलं. (Nashik Todays News)

पीडित मुलीने काय म्हटलं?

'दोन ते तीन आठवड्यांपूर्वी आमच्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. तेव्हा आम्ही सर्व मुली झाडे लावण्यासाठी गेलो. तेव्हा आमचे सर बोलले मागच्या वर्षी आम्ही जे झाडं लावले ते जगले नाही, त्याचं कारण मुलींना मासिक पाळी येते त्यावेळी त्या झाडांकडे जातात त्यामुळे झाडे जगली नाहीत'. असं पीडित तरुणीने म्हटलं आहे.

इतकंच नाही तर 'शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की, ज्या मुलीला मासिक पाळी आली आहे त्यांनी आता झाडे लावायची नाही, त्यांनी लावलेली झाडे लवकर मरतात. याशिवाय मुलींनी लावलेल्या झाडांकडे सुद्धा यायचं नाही' असं शिक्षकांनी आम्हाला म्हटलं असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

'याबाबत आम्ही शिक्षकांना विचारलं असता, त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही जास्त शहाण्या झाल्या आहेत का? तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या कोण'? अशी दमदाटी सुद्धा शिक्षकांनी पीडित मुलींना केली असल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

दरम्यान, एकीकडे देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान झाल्या. तर दुसरीकडे आदिवासी मुलींनाच अशी वागणूक मिळत असल्याने खरचं आपल्या देशात महिलांना मानसन्मान दिला जातो का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. आता या आश्रमशाळेवर प्रशासन काय कारवाई करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT