Solapur News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News : नवीकोरी कार जीवावर बेतली, सोलापुरातील शिक्षकाचा कारसह विहिरीत बुडून मृत्यू

Teacher Dies in Solapur : सोलापुरातील भाटेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.

विश्वभूषण लिमये

Solapur News :

नवीन कारमध्ये शिक्षकांच्या जीवावर बेतल्याची घटना सोलापुरातून समोर आली आहे. नवीन कार घेतलेल्या आनंदात असलेल्या कुटुंबावर ५-६ दिवसातच दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नवीन कार घेतलेल्या शिक्षकाचा कार विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. सोलापुरातील भाटेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.

ईरन्ना बसप्पा जूजगार असं ४१ वर्षीय शिक्षकाचं नाव आहे. ईरन्ना यांना गाडी घेतल्याचा खूप आनंद झाला होता. आनंद साजरा करण्यासाठी ते कुटुंबियांसह कार घेऊन आपल्या मेहुण्याच्या घरी गेले होते. कार चालवता येत नसल्याने खासगी ड्रायव्हर घेऊन ते मेहुन्याच्या घरी पोहोचले होते. (Accident News)

तिथे पोहोचल्यानंतर ईरन्ना यांना मोकळी जागा दिसल्याने गाडी चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे गाडी चालवण्यासाठी ते ड्रायव्हिंग सीटवर बसले. मात्र गाडी चालवण्याचा अंदाज नसल्याने त्यांचा गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट शिवारातील विहिरीत कोसळली.  (Latest Marathi News)

घटनेनंतर गावातील लोकांना तातडीने ईरन्ना यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जवळपास तासाभरानंतर ईरन्ना विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. बेशुद्ध अवस्थेत ईरन्ना यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत शिक्षक ईरन्ना यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT