Aurangabad Tea Seller Success Story
Aurangabad Tea Seller Success Story Saam TV
महाराष्ट्र

Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून तरुणांनी सुरू केला चहाचा व्यवसाय; कमाई ऐकून थक्क व्हाल!

Satish Daud-Patil

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Success Story : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अनेक तरुण करतात. ही परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचं त्यांचं स्वप्न असतं. पण, सतत वाढणारी स्पर्धा, कमी जागा आणि परीक्षेचं अनियमित प्रमाण यामुळे सर्वच तरुणांचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. काही तरुण यामुळे निराश होतात. तर काही जण वेळीच बाहेर पडत नवी वाट निवडतात. औरंगाबादच्या दोन तरुणांनीही वेळीच यामधून बाहेर पडत चहावाला होण्याचं ठरवलं. आता चहाच्या व्यवसायातून ते महिन्याला एक ते दीड लाख रुपये कमावतात. (Latest Marathi News)

आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला चहा हा वेळेवर हवाच असतो. इतकेच काय तर देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले पंतप्रधान देखील लहानपणी चहा विकत होते, असा त्यांचा इतिहास आहे. यातूनच मुळच्या बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या शुभम तळणीकर आणि संकेत पालवे या दोन तरुणांनी औरंगाबादमध्ये 'चाय मेकर्स' या व्यवसायाच्या माध्यमातून नवी ओळख निर्माण केलीय. त्यांनी औरंगाबादमध्ये बीएससीचं शिक्षण घेतलं.

या शिक्षणानंतर संकेतनं पुण्यात जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. दोन-तीन वर्ष या अभ्यासात घालवल्यानंतरही जागा निघत नव्हत्या. तर, शुभम हा पंजाबमधील एका कंपनीमध्ये मार्केटींगचा जॉब करत असे. या जॉबमध्ये शुभम समाधानी नव्हता. दोन्ही मित्र आयुष्यात यशस्वी होण्यासाठी धडपडत होते. त्याचवेळी कोरोना व्हायरसच्या साथीमुळे लॉकडाऊन लागलं. स्पर्धा परीक्षेच्या जागा निघत नव्हत्या. त्यावेळी संकेतनं व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानं शुभमलाही सोबत व्यवसाय करण्याची ऑफर दिली.

यानंतर संकेत आणि शुभम यांनी औरंगाबादमध्ये चहा कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला. या कॅफेसाठी तब्बल तीन लाख खर्च करुन नागेश्वरवाडी भागात सेटअप उभारला. दोघंही व्यवसायात नवीन होते. त्यांना कोणताही अनुभव नव्हता. पहिल्या तीन महिन्यांमध्ये काही प्रतिसाद नसल्यानं 'आपण चूक केली नाही ना' असा विचार त्यांच्या मनात आला होता. दर्जेदार चहाची क्वालिटी, संयम आणि सातत्य या जोरावर त्यांचा व्यवसाय वाढू लागला.

चाय मेकर्स कॅफे सुरू होऊन आता सात महिने झाले आहेत. स्पर्धा परीक्षेचा जोरदार अभ्यास केला पण जागा निघत नसल्यानं भविष्याबाबत चिंता होती. त्यामुळे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. आता या व्यवसायात जम बसला आहे. आगामी काळातही हा व्यवसाय आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे', असं शुभमन सांगितले.

उच्च शिक्षणानंतर इतर ठिकाणी नोकरी करुन आयुष्यात मोठे होण्याचे स्वप्न प्रत्येक तरुणाचे असते यासाठी अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारीही करतात. परंतु सध्या स्पर्धा परीक्षेसाठी वाढलेली विद्यार्थी संख्या आणि वेळेवर न निघणाऱ्या जागा यामुळे शुभम आणि संकेत यांच्यासारखा एखादा व्यवसाय टाकून आपण निश्चितच आयुष्यात यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी यातून दाखवून दिलंय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आकर्षक रोषणाई

Nilesh Lanke News | निलेश लंकेंचा पोलिसांवर सनसनाटी आरोप! कार्यकर्त्यांना कुणी धमकावलं?

Sharad Pawar यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं?

Keratin Treatment: केसांवरील केराटीन ट्रिटमेंट शरिरासाठी ठरेल घातक; 'हा' गंभीर आजार होण्याची शक्यता

Uttar Pradesh News: अंघोळ करणाऱ्या महिलेला चोरून बघणारा जिवानीशी गेला; टेरेसवर तरूणासोबत घडलं भयंकर

SCROLL FOR NEXT