Tanushree Dutta shares an emotional moment in a viral video, sparking fresh allegations against actor Nana Patekar. Saam Tv
महाराष्ट्र

Nana Patekar: तनुश्री दत्ताचा पुन्हा नानांवर आरोप; माझा छळ होतोय

Tanushree Dutta: ज्येष्ठ नेते नाना पाटेकरांवर 2018 मध्ये लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्तानं पुन्हा एकदा नानांवर आरोप केलाय़. तनुश्रीच्या आरोपानं खळबळ उडालीय.. नेमकं प्रकरण काय?

Omkar Sonawane

चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्त पुन्हा एकदा चर्चेत आलीय... कारण तिने घरातच आपला छळ होत असल्याचा हमसून हमसून रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन मदतीचं आवाहन केलंय...

खरंतर तनुश्री दत्तच्या व्हिडीओत तिने कुणाचंच नाव घेतलं नव्हतं... त्यामुळे तनुश्रीचा छळ नेमकं कोण करतंय? असा प्रश्न निर्माण झाला होता... त्यामुळे अखेर साम टीव्हीने तनुश्रीशी संपर्क साधला... यावेळी तनुश्री दत्तने थेट नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत....

आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या तनुश्री दत्तने नाना पाटेकर यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करत वादाला तोंड फोडलं.... मात्र तनुश्रीच्या या वादाचा सिक्वेल मोठा आहे... तो नेमका कसा आहे?

तनुश्री दत्ताच्या वादाचा सिक्वेल

2018

हॉर्न ओके प्लीजच्या सेटवर नाना पाटेकरांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप

2018

कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप

2024

चॉकलेटच्या सेटवर विवेक अग्निहोत्रींकडून अपमानास्पद वागणूकीचा आरोप

2024

राखी सावंतविरोधात पोलिसांत तक्रार केल्याची चर्चा

तनुश्री दत्ताने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी धाव घेतली... मात्र तनुश्रीने कुणाहीविरोधात तक्रार देण्यास नकार दिलाय.. त्यामुळे तनुश्रीने केलेला व्हिडीओ स्टंट होता की खरंच तिला कुणी त्रास देत आहे? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

व्हॉट्सअॅपसाठी पैसे मोजावे लागणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Zilla Parishad Election: भाजपनं ठाकरेंचा उमेदवार पळवला? पनवेल तहसील कार्यालयावर शेकापचा राडा, माघार घेण्यावरून रंगला राजकीय ड्रामा

SCROLL FOR NEXT