तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी
बातमी आरोग्य खात्यातल्या इन्व्हेस्टिगेशनची. 'HLL लाईफकेअर' या कंपनीला टेंडर न काढताच हजारो कोटींचं कंत्राट दिल्याचं समोर आलंय. सरकारनामाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आलीय. या 'HLL लाईफकेअर' कंपनीविरोधात बोगस बिलं काढल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी बनवाबनवी करत हे काम दिल्याचं बोललं जातंय, पाहूया एक रिपोर्ट
राज्यात आरोग्य खात्यात झालेल्या 10 हजार कोटींच्या अॅम्ब्युलन्स घोटाळ्यानं सरकारला तोंड दाखवायला जागा राहीलेली नसताना आता आरोग्य खात्यातील आणखी एक कारनामा बाहेर आलायं. त्यामुळे मंत्री तानाजी सावंत यांच्या आरोग्य खात्याचा कारभार 'क्रिटिकल' झालाय. राज्यभर 'डायलिसिस'ची सुविधा पुरविण्याच्या हेतुने 'HLL लाइफकेअर' कंपनीला टेंडर न काढताच तब्बल 2 हजार कोटी रुपयांचं काम बेकायदेशीरपणे दिल्याचं 'सरकारनामा'च्या 'इन्व्हेस्टिगेशन'मधून पुढं आलंय.
याप्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत या सगळ्यांनी 'बनवाबनवी' करून 'एचएलएल लाइफकेअर' काम दिल्याचं आरोग्य अधिकारी सांगतायत..तर विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय...
राज्यातील जनतेला आधीच मुलभूत सोयीसुविधा मिळताना नाकीनऊ येतात. थोड्याश्या पावसात रस्ते तुंबतात, पालिकेची आरोग्य यंत्रणाच रुग्णशय्येवर आहे.ग्रामीण भागात आजही रस्ते नसल्यानं अनेकांचा जीव दगावतो.हे ढळढळीत वास्तव...असं असताना मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि मंत्र्यांनी पोसलेल्या ठेकेदारांना सांभाळणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानं HLL सारख्या कंपन्या पोसल्या जातात हे उघडं आहे. याला जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर आणि संबंधित मंत्र्यांवर कारवाई होणार का हेच पाहायचं
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.