Tanaji Sawant Controversial Statement ON NCP:  Saamtv
महाराष्ट्र

NCP Vs Shivsena: 'आता बस्स...', तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत मिठाचा खडा; राष्ट्रवादीचा थेट बाहेर पडण्याचा इशारा

Tanaji Sawant Controversial Statement ON NCP: शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये तणाव वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, नाहीतर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

Gangappa Pujari

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपले कधीच पटले नाही. आता कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात, असे म्हणत राज्याचे आरोग्यमंत्री, शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये तणाव वाढला असून अजित पवार गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत तणाव!

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये तणाव वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, नाहीतर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असा थेट इशारा राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला आहे. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, अजित दादांचा अपमान सहन करणार नाही, असेही उमेश पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते संतापले!

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचा अपमान करत असतील, महायुतीमध्ये राहायचं की नाही राहायचं हे ठरवावे लागेल. तानाजी सावंत यांच्या व्यक्तव्यावर मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट प्रमाणेच एक बैठक घ्यावी. दररोज कोणीतरी उठून उभा राहतो, आधी नितेश राणे, सदाभाऊ खोत आता तर तानाजी सावंत बोलले. तानाजी सावंत यांचा साखर कारखान्याच्या उद्घाटनाला पवार चालतात. तेव्हा मळमळ नव्हती का राष्ट्रवादीची? असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरींनी दिला इशारा

"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या मंत्र्यांच्या तोंडावर आवर घालावा. त्यांना मळमळ होते, त्यामुळे मेडिसिनची आवश्यकता आहे, ती द्यावी लागेल. अजित पवारांना टार्गेट करून त्यांना आत्मिक समाधान भेटत असेल तर आम्ही हे खपून घेणार नाहीये, आता अजित पवार आणि राष्ट्रवादीवर बोलतांना थोबाड आवरावे, महायुतीतील दोन्ही पक्षांनी लक्षात हे ठेवावे" अशा थेट इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

दरम्यान, तानाजी सावंत यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही नाराजी दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून महायुती सांभाळणं तिन्ही पक्षांचे काम आहे त्यामुळे अशा वक्तव्यांमुळे दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देखील या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: आमदार चिखलीकर यांना भविष्यात मोठी जवाबदारी मिळणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले संकेत

भाजपप्रणित NDA ला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT