Taliye Village Landslide  Saam tv
महाराष्ट्र

Taliye Village Landslide : तळीये गावावर आजही दुखाचा डोंगर जसाच्या तसाच; राज्य सरकारकडून दिलासा कधी मिळणार?

Taliye Village Landslide Latest Update : तळीये गावात हातावर मोजण्या इतकी कुटुंब इथं शिल्लक राहिली आहेत. इतक्या दुर्देवी घटनेनंतरही इथल्या जनतेला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

सोनी मगर

Taliye Village Landslide Latest News :

तळीये दूर्घटनाग्रस्तांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या गावात दरड कोसळली. त्यानंतर संपूर्ण गाव जमिनीखाली गाडलं गेलं. यामुळे गावातील अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. या गावातील लोकांच्या जुन्या आठवणी काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत. हातावर मोजण्या इतकी कुटुंब इथं शिल्लक राहिली आहेत. इतक्या दुर्देवी घटनेनंतरही इथल्या जनतेला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आलं आहे. (Latest Marathi News)

समस्या कधी संपणार?

तळीये गावातील दुर्घटनेला 2-3 वर्ष उलटूनही गावकऱ्यांच्या समस्या काही संपण्याचं नाव घेत नाहीये. शासनाने गावकऱ्यांना पक्की घरं बांधून दिली, मात्र या घरांचं बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिक तिथे राहण्यासाठी घाबरत आहेत.

पाणी, लाईट अशा मुलभूत सुविधांचाही येथे अभाव असल्याचे समोर आलं आहे. गावकऱ्यांना पक्की घरं मिळूनही दुर्घटनाग्रस्त रहिवासी हे शासनाने दिलेल्या कंटेनरमध्येच राहत आहेत.

गावातील घरांचा दर्जा खराब

22 जुलै 2021 रोजी तळीये गावातील कोंढळकरवाडी येथे दरड कोसळली होती. या दुर्घटनेत तब्बल 87 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तब्बल 66 कुटुंब ही या घटनेमुळे रस्त्यावर आली होती.

दरम्यान, शासनाने तात्पुरती व्यवस्था म्हणून लोखंडी कंटेनरमध्ये नागरिकांना राहण्यास जागा दिली. दुर्घटनाग्रस्तांना कायम स्वरूपी घरे देण्यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला. त्यांनी घरे देखील बांधून दिली. मात्र, या घरांचा दर्जा खराब असल्याने त्यांनी ही घरे घेण्यास नकार दिला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरातील पायाखालच्या फरशा निखळल्या

गेल्या काही दिवसांत 5-6 कुटुंबीयांनी घराचा ताबा घेतला. मात्र शासनाने दिलेल्या या घरांची अवस्था चिंता वाढवणारी आहे. येथे पाणी येतं नाही. गावकऱ्यांनी पाण्यासाठी कॅन भरून आणावे लागतात. येथे इलेक्ट्रिक पुरवठाही होत नाहीये. त्यामुळे गावकरी हवेसाठी झाडांचा आडोसा घेतात.

घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. पायाखालच्या फरशा निखळल्या आहेत. या दुर्देवी घटनेनंतरही इथल्या जनतेला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. गेलेल्या माणसांच्या आठवणी..त्यातही राहण्या..जगण्यासाठीचा संघर्ष, तळीयेकरांची अवस्था चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे या गावकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT