Talathi Bharati 2023 Saamtv
महाराष्ट्र

Talathi Bharati 2023: तलाठी परीक्षा पेपर फुटी प्रकरण! संशयित आरोपी निघाला कॉपीचा मास्टरमाईंड; २ वर्षांपासून होता फरार

Talathi Bharati Paper Leak: आरोपीने २०१९ मधील म्हाडा भरती आणि २०२१ च्या पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचाही पेपर फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik Talathi Exam 2023: नुकत्याच नाशिकमध्ये घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेत पहिल्याच दिवशी गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. नाशिकमधील म्हसरुळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेला तरुण कॉपीचा मास्टर माईंड निघाल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक (Nashik) तलाठी भरती परिक्षेतील पेपर फुटी प्रकरणातील आरोपी गणेश गुसिंगे याच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. याच आरोपीने २०१९ मधील म्हाडा भरती आणि २०२१ च्या पिंपरी चिंचवड पोलीस भरतीचाही पेपर फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी त्याच्यावर 2021 साली गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी फरार असलेल्या या आरोपीला दोन वर्षे कसे काय अटक केली नाही असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. या प्रकरणात त्याच्या आणखी दोन साथिदारांचा समावेश असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आरोपी गणेश गुसिंगे हा शासनाच्या विविध भरती प्रक्रियेत गरजू उमेदवारांचा शोध घेवून त्यांना परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवायचा. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत असल्याचेही समोर आले आहे. सध्या गुसिंगेच्या दोघा साथीदारांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: धुळ्याच्या लेकीचा स्वॅगच भारी, कोण आहे ही अभिनेत्री, सौंदर्य पाहून झोप उडेल

Maharashtra Live News Update: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

दुपारी मोबाइल सील, मग रात्री ११.१३ वाजता व्हॉट्सॲपचा लास्ट सीन कसा? फिंगर लॉकद्वारे...; डॉक्टरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा

Suryakumar Yadav: श्रेयस अय्यरची तब्येत कशीये? पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने दिली महत्त्वाची अपडेट

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी?

SCROLL FOR NEXT