महाराष्ट्र

'काय घ्यायचा तो निर्णय चार आठवड्यात घ्या', जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेबाबत उच्च न्यायालयाचे आदेश

District Cooperative Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती अद्याप सुधारली नसल्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आलेली नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्वभूषण लिमये/साम टीव्ही न्यूज

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सुधारली नसल्याने गेली सहा वर्षे संचालक मंडळ निवडणूक घेण्यात आली नाही आहे. आता निवडणूक घेण्याची मागणी आहे त्यावर चार आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सहकार आयुक्तांना दिले आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाबत दाखल याचिकेवर न्यायमूर्ती ए.एस.चांदूरकर आणि न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून २९ मे २०१८ पासून याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे.

कलम ११० अ अन्वये प्रशासकांची नियुक्ती केली असल्यास जास्तीत-जास्त एक वर्षाचा कालावधी शक्य आहे. कलम १५७ अन्वये शासनाने वेळोवेळी प्रशासकास मुदतवाढ दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाची निवडणूक घेण्याबाबत मागील तीन वर्षापासून उत्तर सोलापूर तालुक्यातील विकाससंस्था उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रयत्न करीत आहेत.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालयात वेगवेगळ्या तीन याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये विकासरत्न दिलीपराव माने विकास सोसायटी, मार्डी विकास सोसायटी, कारंबा विकास सोसायटी आणि बाणेगाव विकास सोसायटीच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी थेट दिल्लीत आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Bitter Melon Juice: दररोज सुदृढ राहायचं आहे? मग रिकाम्या पोटी प्या 'हे' ज्यूस होतील अनेक फायदे

Daily Surya Namaskar effects: दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात होतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT