tadoba national park goggle
महाराष्ट्र

Tadoba News: नाताळ अन् नववर्षानिमित्त ताडोबाची सफारी हाऊसफुल्ल, पट्टेदार वाघ बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Tourist Attractions Tadoba: पर्यटकांनी यंदाही ताडोबाचाच बेत आखून सफारी करण्याचा निश्चय केला आहे. नाताळ आणि नववर्षानिमित्त अनेक पर्यटकांनी ताडोबाला गर्दी केलीय.

Bhagyashree Kamble

जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांनी फुल्ल झाले आहे. नाताळ आणि नववर्षाला अनेकांना सुट्ट्या असतात. लागोपाठ सुट्ट्या असल्याकारणानं ताडोबा हे पर्यटनस्थळ पर्यटकांनी फुलून गेले आहे. तसेच हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स पर्यटकांनी फुल्ल झाले आहेत.

ताडोबाच्या पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. वाघ बघण्याचा हंगाम पुढील जून महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. नाताळ आणि नववर्षानिमित्त अनेकांना लागोपाठ सुट्ट्या आहेत. त्यामुळे अनेक जण चंद्रपुरात जाऊन ताडोबा व्याघ्र पर्यटन स्थळाला भेट देतात. मनसोक्त सफारी करतात. मुंबईसह देशभरातून या ठिकाणी पर्यटक येतात. तर काही कुटुंबासोबत जाऊन वाघ आणि इतर प्राण्यांना जवळून पाहण्याचा आनंद लुटतात.

ताडोबा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र प्रकल्प असल्यानं देश विदेशातील पर्यटक इथे भेट देत असतात. आताही त्यांचे आगमन झाले आहे. पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असे केंद्र नेहमीच पर्यटकांना खुणावत असते. पट्टेदार वाघासोबतच बिबटे, अस्वली, तृणभक्षी प्राणी आणि पक्ष्यांचे विपुल दर्शन हमखास होत असते. ज्यामुळे पर्यटकांचे हे आवडते ठिकाण झाले आहे.

सध्या थंडीचे दिवस असले तरी वाघांचे दर्शन इथे रोज घडत असते. त्यामुळे पर्यटक आवश्य या ठिकाणी भेट देतात. ताडोबाच्या पर्यटनाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. वाघ बघण्याचा हंगाम पुढील जून महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. प्रकल्पात सफारीसाठी पर्यटक मोठ्या संख्येनं येत असल्यानं ताडोबा पर्यटकांनी पुन्हा एकदा गजबजले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

ठाकरे बंधूंचं 'अब ती बार ७५ पार', ठाणे महापालिकेसाठी रणशिंग फुंकले, बड्या खासदाराने दिले संकेत

Maharashtra Live News Update : निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

Akkalkot : दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान अक्क्लकोटचं श्री स्वामी मंदिर 20 तास खुलं राहणार | VIDEO

Education Justice : पुण्यात नामांकित कॉलेजने कागद पडताळणीसाठी केला उशीर, तरुणाची ब्रिटनमधली नोकरी गेली, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT