Maya Tigress Saam TV
महाराष्ट्र

Maya Tigress: ताडोबातील सेलिब्रिटी माया वाघिणीचा मृत्यू ? शोध मोहिमेत सापडले कुजलेले अवयव

Tadoba Andhari Tiger Reserve: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया वाघिणीच्या शोधासाठी वनविभागाने शोध मोहीम राबविली होती. ताज्या सापडलेल्या अवयवांची माया वाघिणीच्या डीएनएशी पडताळणी केली जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय तुमराम

Chandrapur:

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण मायाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी आणि दीडशे कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या शोध मोहिमेत एका वाघाचे कुजलेले अवयव सापडले आहेत.

मानवी हस्तक्षेप नसलेल्या ताडोबा वनक्षेत्रातील ताडोबा बीटात 82 क्रमांकाच्या कक्षात हे अवयव गवसले आहेत. 1 ऑक्टोबर 2023 पासून ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प हिवाळी पर्यटनासाठी पुन्हा एकदा खुला झाल्यानंतर माया वाघीण दर्शन देत नसल्याने वनविभाग व पर्यटकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. 

तेव्हापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया वाघिणीच्या शोधासाठी वनविभागाने शोध मोहीम राबविली होती. ताज्या सापडलेल्या अवयवांची माया वाघिणीच्या डीएनएशी पडताळणी केली जाणार आहे. या महिन्याच्या अंतापर्यंत माया वाघिणीच्या मृत्यूबाबत स्पष्टपणे खुलासा होण्याची शक्यता आहे.

माया होती प्रमुख आकर्षण

एकूण 13 वर्षे आयुष्य लाभलेली माया वाघीण पर्यटकांना सहज दर्शन देत या प्रकल्पाचे आकर्षण होती. लीला आणि हिलटॉप टायगर हे तिचे आईवडील होते. 2014 पासून ती पाच वेळा गर्भवती होती.

तिने 13 बछड्याना जन्म दिला, मात्र विविध कारणांनी यातील केवळ 4 वयस्क होऊ शकली. 2014 पासून ताडोबातील प्रत्येक वन्यजीव गणनेत माया प्रामुख्याने दिसत राहिली. ताडोबा आणि कोलारा वनपरिक्षेत्र हे विस्तीर्ण जंगल तिच्या भ्रमंतीचे क्षेत्र होते.

ऑगस्ट 2023 मध्ये पायी गस्त करणाऱ्या पथकाला माया ताडोबा तलाव भागातील पंचधारा पॉईंटवर नजरेस पडली होती. मायाला शोधताना शोध पथकाने 7 नर आणि 6 मादी वाघांची नोंद केली, ही समाधानाची बाब ठरली. मात्र यात मायाचा समावेश नव्हता. ताडोबा बिटातील ज्या वाघाचे अवयव गवसले आहेत, त्याचे पोस्टमार्टेम होऊ शकत नसल्याने बंगळुरूच्या (National Centre for biological sciences and Centre for cellular and molecular biology) संस्थेत पाठविले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT