Auranagabad Crime Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा ऑनलाइन तलवारी खरेदी; ३ तलवारी जप्त

औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आला होता. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता परत एकदा औरंगाबाद (Auranagabad) क्रांती चौक पोलिसांनी ३ तलवारी जप्त केल्या आहेत. बनावट नाव आणि पत्ता नोंदवून ऑनलाइन (Online) तलवारी खरेदी मागविणाऱ्यासह तिघांना क्रांती चौक पोलिसांनी रविवारी अटक (Arrested) करून आणखी ३ तलवारी जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे पोलिस (Police) चौकशीमध्ये या आरोपीने या अगोदर देखील तलवारी खरेदी केल्याचे मान्य केले आहे.

यामध्ये १ तलवार त्याच्या घरात तर २ तलवारी (Sword) २ जणांना विक्री केल्याचे सांगितले आहे. अबरार शेख जमील उर्फ शाहरूख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. क्रांती चौक पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकून ३७ तलवारी आणि १ कुकरी जप्त करण्यात आली होती. याअगोदर देखील २ वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनी (Courier company) कडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.

हे देखील पहा-

गेल्या आठवड्यात क्राईमब्रँच कडून तलवार मागवणारे २ जणांना ताब्यात घेतले होते. औरंगाबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर सातत्याने तलवारी का येतात. कुठुन आणि कशी येतात याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या कारवाईनंतर अशी माहिती मिळाली होती की, जालिंदर आणि अमृतसर येथून तलवारी मागवण्यात आले होते. या ३७ तलवारी ७ जणांच्या नावावर मागवण्यात आले होते. यामध्ये ५ जण औरंगाबाद येथील तर २ जण जालन्यातील आहेत. आपल्या मोबाईल वरुन सहज ऑनलाईनवर शस्त्रे मागवता येतात. दिल्ली, अमृतसर आणि राजस्थानमधून हे शस्त्र भिवंडीच्या एका गोडाऊनमध्ये दाखल होतात आणि तिथून महाराष्ट्रभर वितरित होत आहेत.

मात्र, औरंगाबाद मध्ये DTDC याच कुरियर सर्विसच्या मार्फत ही शस्त्र का आली हा देखील प्रश्न आहे. औरंगाबादच्या दंगलीनंतर २०१८ मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मागवण्यात आला होता. या अगोदर जुलै २०२१ मध्ये ४१ तलवारी, २ गुप्ती आणि ६ कुकरी असा शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त करण्यात आला होता. अशा कुरियर कंपनीद्वारे शोभेच्या वस्तू म्हणून तलवारी मागवल्या जातात आणि त्यानंतर त्याला धार लावली जाते, अशी माहिती मिळाली आहे. या तलवारी ज्याच्या नावावर आणि पत्त्यावर मागवण्यात आले, त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ते देखील अर्धवट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. यामुळे या तलवारी कोणत्या उद्देशासाठी मागवल्या होते हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT