"समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारता", असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु
Chitra Wagh
Chitra WaghSaam Tv

कोल्हापूर: सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान, काल भाजपाच्या चित्रा वाघ या भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आले असता त्यांच्या सभेवर दगडफेक (Stone throwing) झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. सभा सुरु असताना काही जणांनी त्यांच्या दगडफेक केली असे त्या म्हणाल्या आहेत.

हे देखील पहा-

शहरात मुक्त सैनिक वसाहत येथील जाहीर सभेत हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रीतसर फिर्याद नोंदवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्या म्हणतात, वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारता. आज संध्याकाळी भाजपा (BJP) उत्तर कोल्हापूर उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये मी बोलत असतांना तिथे दगडं मारण्यात आली.

तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांवर दाखवा असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा, असे वाघ यांनी खडासावून सांगितले आहे. दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक (By-election) प्रचारासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ कोल्हापुरात आले आहेत. शहरात मुक्त सैनिक वसाहत आणि राजारामपुरी येथे त्यांची जाहीर सभा होती.

Chitra Wagh
अशोकराव, तुम्ही मध्यस्थी करा; बुलेट ट्रेनचं काम पूर्ण करा- फडणवीसांची विनंती

मात्र, यावेळी सभेवर काही जणांनी दगडफेक केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी सरकार चालवत असून काँग्रेस आणि सेनेच्या नेत्यांचे फक्त गाड्या फिरवण्याचे काम सुरु असल्याचे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे. काँग्रसने ५० वर्षात काय केले आहे ते सांगा असे चंद्रकांत पाटील म्हणत आहेत. तर सतेज पाटील देखील त्यांच्यावर जोरदार टीका करताना दिसून आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com