sweater distributed to citizens in dharashiv by samaj vikas sanstha saam tv
महाराष्ट्र

Dharashiv: धाराशिवला कडाक्‍याची थंडी; समाज विकास संस्था अन् दान उत्सव समितीने दिली वंचितांना मायेची ऊब

पहाटे व रात्रीच्या सुमारास नागरिक शेकोटी पेटवून ऊब घेत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News :

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका (cold weather in dharashiv) चांगलाच वाढला आहे. थंडीमुळे संध्याकाळी नागरीकांची शहरातील तसेच गावातील वर्दळ कमी हाेऊ लागली आहे. दरम्यान थंडीने कुडकुडणाऱ्या माणसांचा शोध घेत त्यांना उमरगा येथे समाज विकास संस्था व दान उत्सव समितीच्या वतीने शाल, स्वेटर व अन्य उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. (Maharashtra News)

धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. शनिवारी रात्री १९ डिग्री सेल्सिअस पारा घसरला आहे. रोज संध्याकाळी असणारी नागरीकांची शहर आणि गावातील वर्दळ आणि गावातील वर्दळ थंडीमुळे कमी झाल्याचे दिसत असुन थंडीपासून संरक्षणासाठी कानाला टोप्या लावुन तसेच मफलर गुंडाळून व उबदार कपडे घालून बाहेर वावरणारे लोक दिसत आहेत. तर भल्या पहाटे, सकाळी व रात्री लोक शेकोटी पेटवून ऊब घेत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे समाज विकास संस्था व दान उत्सव समिती यांच्या वतीने उमरगा शहरातील बसस्थानक,रुग्णालये व रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना शाल व कपड्यांचे वाटप करण्यात आले. समितीच्या कार्यकर्त्यांनी लोकसहभागातुन या साहित्याचे वाटप केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

थंडीत कुडकुडणाऱ्या शेवटच्या माणसांचा शोध घेऊन दरवर्षी हिवाळ्यामध्ये संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो. कपड्याच्या दानाचा महोत्सव व्हावा, विचाराचा महोत्सव व्हावा, अन्नदानाचा महोत्सव व्हावा म्हणून समाज विकास संस्था शेवटच्या माणसांचा शोध घेत कार्य करीत आहे असे मत यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या माणगावमध्ये कोसळल्या पावसाच्या सरी

शरद पवार गटाला धक्का; २ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

SCROLL FOR NEXT