swarajya party opposed obc elgar melava in hingoli saam tv
महाराष्ट्र

OBC Elgar Melava: धमक असेल तर सभा उधळून दाखवा, ओबीसी एल्गार मेळाव्याच्या संयोजकांचे 'स्वराज्य'ला आव्हान (पाहा व्हिडिओ)

हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर ओबीसींच्या महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी / संदीप नागरे

OBC Elgar Morcha :

ज्या कोणात धमक असेल त्यांनी उद्याची सभा उधळून दाखवावी. आम्ही त्यांना बघून घेऊ सज्जड इशारा ओबीसी एल्गार मेळाव्याचे मुख्य संयोजक डाॅ. बी.डी चव्हाण यांनी दिला आहे. हिंगोली येथे उद्या (रविवार) ओबीसींचा महा एल्गार मेळावा आयाेजित करण्यात आला आहे. हा मेळावा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यास बी.डी चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. (Maharashtra News)

उद्या ओबीसींचा महामेळावा

महाराष्ट्रात ठिकठिकाणी ओबीसी समाज रस्त्यावर उतरत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड मध्ये ओबीसी समाजाचा मेळावा पार पडल्यानंतर आता उद्या (रविवार) हिंगोली मध्ये ओबीसींचा महामेळावा पार पडणार आहे.

हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर या ओबीसींच्या महामेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या मेळाव्यासाठी चार लाखांपेक्षा अधिक ओबीसी बांधव एकवटणार असल्याने, आयोजकांकडून पार्किंग नाश्ता व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

छगन भुजबळांच्या भाषणाकडं राज्याचे लक्ष

या महामेळाव्यात राज्याचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) , विजय वड्डेटीवार (vijay wadettiwar) , प्रकाश शेंडगे (prakash shendge) , शब्बीर अन्सारी यांची उपस्थिती राहणार आहे. दरम्यान या मेळाव्यामधून छगन भुजबळ नेमके काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

त्यांना बघून घेऊ : डाॅ. बी.डी चव्हाण

दरम्यान छगन भुजबळ यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोलू नये, छगन भुजबळ यांनी माफी मागावी अन्यथा उद्याची सभा उधळून लावू असा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर यांनी दिले हाेते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यास ओबीसी एल्गार मेळाव्याचे मुख्य संयोजक डाॅ. बी.डी चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. ज्या कोणात धमक असेल त्यांनी उद्याची सभा उधळून दाखवावी. आम्ही त्यांना बघून घेऊ सज्जड इशाराच ओबीसी एल्गार मेळाव्याचे मुख्य संयोजक डाॅ. बी.डी चव्हाण यांनी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

मुंबईतील ७९ नगरसेवकांचं पद जाणार? निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपाने खळबळ

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

SCROLL FOR NEXT