Ashok Chavan: ते पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव; अशोक चव्हाण भडकले

राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे अशी मागणी अशाेक चव्हाण यांनी केली आहे.
maratha andolan and releasing water to jayakwadi are different issues says congress leader ashok chavan
maratha andolan and releasing water to jayakwadi are different issues says congress leader ashok chavansaam tv
Published On

- संजय सूर्यवंशी

Jayakwadi Dam Water Issue :

जायकवाडीत पाणी (jayakwadi dam latest marathi news) सोडण्या संदर्भात काढण्यात आलेले पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला (maratha andolan) बदनाम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (congress leader ashok chavan) यांनी केली. मराठा आरक्षणसाठीचे आंदोलन आणि पाणी सोडण्याचा काय संबंध आहे असा सवालही अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे साम टीव्हीशी बाेलताना उपस्थित केला. (Maharashtra News)

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र लिहलेले आहे. या पत्रात मराठा आरक्षणाचे (maratha reservation) आंदोलन सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेता उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या शासनस्तरावरून सूचना दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पत्रात पाणी सोडण्याची कार्यवाही स्थगित ठेवल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.

maratha andolan and releasing water to jayakwadi are different issues says congress leader ashok chavan
Mla Sangram Jagtap: आमदार संग्राम जगताप मंगळवारी बसणार उपाेषणास, प्रशासनास दिला इशारा; जाणून घ्या कारण

या पत्रावर माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव आहे, पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. सदरहू पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान भाजपशी युती करण्याच्या महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाच्या कोणत्याही हालचाली सुरू नाहीत असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. आमदार नितेश राणेंचे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य म्हणजे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही अशोक चव्हाण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

maratha andolan and releasing water to jayakwadi are different issues says congress leader ashok chavan
Winter Chill : दिवाळीच्या सुट्ट्या आणि गुलाबी थंडीची मजा; महाबळेश्वर १० अंशांवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com