सांगली: भाजप खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, असा आरोप आहे. याच निषेधार्थ आज सांगलीच्या तासगाव (Tasgaon) तालुक्यातील खासदार संजय काका पाटील यांच्या चिंचणी येथील घरावरती भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी हा मोर्चा अडवला यावेळी पोलिसांच्या आणि आंदोलकांच्या मधे झटापट झाली (Swabhimani shetkari sanghatna and farmers morcha on Sanjay Kaka Patils bungalow).
तासगाव (Tasgaon) आणि नागेवाडी (Nagewadi) कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची सुमारे 30 कोटीची ऊस बिले मिळवुन देण्यात आली आहेत. अद्यापही अजून काही शेतकऱ्यांची ऊस बिले थकित आहेत. म्हणुन 23 डिसेंबर रोजी तासगाव तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
त्या मोर्चावेळी 15 जानेवारीचे धनादेश देण्यात आले होते. मात्र, ते धनादेश वाटले नाहीत. यचाच अर्थ खासदार संजयकाका पाटील यांनी पुन्हा शेतकऱ्यांना फसवले आहे. म्हणून आज संजयकाका पाटील यांच्या बंगल्यावर मोर्चा (Morcha) काढण्यात आला होता.
कारखान्याने दिलेले 15 जानेवारीचे चेक बाउंस झाले आहेत. तर संजयकाका पाटलांनी फसवलं गंडवलं आहे. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी आता 2500 नाही 2850 घेणार आणि मगच उठणार असा पवित्रा घेतला आहे. चिंचणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही. असा पवित्रा याठिकाणी घेतला आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.