Raju Shetti, Barsu Refinery Project, Ratnagiri News, Barsu Refinery
Raju Shetti, Barsu Refinery Project, Ratnagiri News, Barsu Refinery saam tv
महाराष्ट्र

Barsu Refinery Police Lathicharge: आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर 'स्वाभिमानी' आक्रमक; चलाे बारसू... राजू शेट्टींचे शेतक-यांना आवाहन

अमोल कलये

Barsu Refinery Protests : बारसू रिफायनरी प्रकल्पास विराेध करणा-या आंदोलकांवर आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास पाेलिसांनी लाठीचार्ज (Barsu Refinery Police Lathicharge) केला. यामध्ये दोन आंदोलक जखमी झाले तर काहींना पाेलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा सारा प्रकार दडपशाहीचा असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि जालिंदर सिंग यांनी केली आहे. राज्यातील सर्व शेतक-यांनी बारसूला जाऊ या आणि शेतक-यांना न्याय देऊ असे आवाहन शेट्टी यांनी केले. (Breaking Marathi News)

या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम थांबविण्यासाठीचा निर्धार आज स्थानिकांनी केला हाेता. त्यासाठी सकाळपासून बारसूच्या सड्यावर आंदोलक जमा झाले हाेते. त्या ठिकाणी पोलिसांचा माेठा फौजफाटा हाेता. पाेलिसांनी आंदाेलकांची भेट घेण्यासाठी आलेल्या खासदार विनायक राऊत यांना ताब्यात घेत राजापूर पाेलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास आंदाेलकांनी पाेलिसांनी उभारलेले बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आंदाेलकांवर लाठीचार्ज केला. त्यात काहीजण जखमी झाले.

स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते जालिंदर सिंग हे आंदाेलकांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना राजापूरात पाेलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी सिंग यांनी भूमीपुत्राच्या मागण्या शासनानं ऐकुन घ्याव्यात असे आवाहन केले. कोकणात प्रदुषण मुक्त प्रकल्प आणावेत. विकासाच्या गर्भात जे दात आणि नख आहेत त्याला आमचा विरोध राहणार असे सिंग यांनी नमूद केले.

ते म्हणाले दडपशाहीचे काम शासनाला शोभणारे नाही. अश्रृधूर आणि लाठीचार्ज करणे योग्य नाही. साडेअकरा कोटी महाराष्ट्राची जनता तिथे आली तर तुम्ही त्यांना अटक करणार का असा सवाल जालिंदर सिंग यांनी केला.

पाेलिसांच्या लाठीचार्जचा स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी निषेध केला. ते म्हणाले बारसूतील शेतक-यांच्या पाठीशी आपण राहू. राज्यभरातील शेतक-यांनी बारसू येथे जाऊ. पाहू यांच्याकडे किती गाेळ्या आहेत. लाठ्या आहेत असेही शेट्टींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes: मार्केट होणार जाम! जूनमध्ये लॉन्च होणार Royal Enfield Guerrilla 450; किती असेल किंमत?

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT