ravikant tupkar protests against maharashtra government near chikhali saam tv
महाराष्ट्र

...अन्यथा 'स्वाभिमानी' राज्यातील महावितरणची कार्यालये फाेडेल : रविकांत तुपकर

एकंदरीतच तुपकरांच्या आक्रमक भुमिकेमुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संजय जाधव

बुलडाणा : शेतकऱ्यांना दिवसा विज मिळावी यासाठी गेल्या १० दिवसांपासून राजू शेट्टींच्या (raju shetti) कोल्हापुरातील (kolhapur) आंदोलनाची दखल न घेतल्याने राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटना याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज (शुक्रवार) ‘स्वाभिमानी’ चे नेते रविकांत तुपकरांसह (ravikant tupkar) शेकडो शेतक-यांनी (farmers) नागपूर – सोलापूर महामार्ग चिखली जवळ पेठ फाट्यावर अडवून धरला आहे.

जोपर्यंत राजू शेट्टीच्या आंदोलनावर मार्ग निघत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका तूपकरांनी घेतल्याने नागपूर – सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

तुपकर म्हणाले रात्री जंगली जनावरे, साप, विंचू काट्याचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो म्हणून दिवसा विज द्या ही ‘स्वाभिमानी’ची मागणी आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांची दखल न घेतल्यास राज्यभरातील महावितरणची कार्यालये (mahavitran offices) उध्वस्त करू असा गंभीर इशारा रविकांत तूपकरांनी आंदोलन स्थळावरून दिला आहे.

दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मार्गात अडथळा होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी आंदोलकांकडून मुभा दिली जात आहे. एकंदरीतच तुपकरांच्या आक्रमक भुमिकेमुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT