- रणजीत माजगावकर
Sourabh Raju Shetti News : साखर कारखानदारांनी ऊसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोल्हापूरसह हातकणंगले येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर वाहतूक रोखली. (Maharashtra News)
स्वाभिमानीने साखर कारखानदारांना ऊसाला एफआरपी अधिक दुसरा हप्ता 400 रुपये प्रति टन मिळावा अशी मागणी केली आहे. ही मागणी कारखानादारांनी अद्याप मान्य केलेली नाही. त्यामुळे काेल्हापूरात काही साखर कारखान्यांसमाेर सौरभ शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी ढोल वाजवत कारखानदारांना जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांनी आंदाेलनाची पुढील भूमिका स्पष्ट केली.
त्यानूसार स्वाभिमानीचे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचे दिसून आले. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील असूर्ले पोर्ले इथल्या दत्त दालमिया साखर कारखाना, यांच्या ४ साखरेचे ट्रक तर इथेनॉलचे दोन टँकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवले.
करवीर तालुक्यातील भुयेवाडी इथे 4 ट्रक, 2 टँकर अडवले. हे आंदाेलन सौरभ राजू शेट्टी यांनी स्वतः शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बराेबर घेऊन छेडले. त्यांनी मुंबईला जाणारी साखर व इथेनॉल टँकर अडवले. गेल्या हंगामातील दुसऱ्या हप्ताचे ४०० रुपये दिल्याशिवाय साखरेचा एक कण बाहेर काढायचा नाही असा इशारा वाहतुकदारांना देखील शेट्टी यांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.