raju shetti's swabhimani shetkari sanghatana andolan at dalmia sugar factory kolhapur saam tv
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana : चर्चा फिस्कटली; 'दत्त-दालमिया'वर 'स्वाभिमानी'चा ठिय्या

दत्त दालमिया कारखान्यावर पाेलीसांनी ठेवलाय तगडा बंदाेबस्त.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजू शेट्टी (raju shetti) यांच्या नेतृत्वाखाली काटाबंद आंदोलनास प्रारंभ झाला आहे. जो पर्यंत प्रशासन उसाला 3384 रुपये पहिली उचल जाहीर करत नाही तोपर्यंत काटा बंद आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर करीत तेथेच ठिय्या मांडला आहे. (Maharashtra News)

चालू हंगामात दालमिया प्रशासनाने ऊसाला पहिली उचल प्रतिटन 3200 रुपये जाहीर केली. मात्र यंदाची रिकव्हरी 3,284 रुपये बसत असल्याने शेतकऱ्यांनी 3200 रुपये हा दर अमान्य केला आहे. त्यानंतर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बोलवलेली बैठक देखील निष्फळ ठरली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दत्त दालमिया कारखान्याचा काटा बंद करण्यासाठी आंदाेलन छेडण्याचा इशारा दिल्याने कारखानास्थळी पाेलीसांचा माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलीसांनी कार्यकर्त्यांना गेटवरच रोखले. त्यामुळे गेट समोरच राजू शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत दत्त दालमिया प्रशासन उसाला 3384 रुपये पहिली उचल जाहीर करत नाही तोपर्यंत काटा बंद आंदोलन सुरूच राहणार असे शेट्टींनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

Government Scheme: बंगालमधल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT