swabhimani shetkari sanghatana andolan at alewadi project near sangrampur buldhana Saam Digital
महाराष्ट्र

Swabhimani Shetkari Sanghatana Andolan: आलेवाडी प्रकल्पाच्या भिंतीवर 'स्वाभिमानी'चे आंदोलन, संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी निर्णयावर ठाम

Buldhana Latest Marathi News : दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम चालु ठेवण्यासाठी विंनती केली. परंतु तोडगा न निघाल्याने शेतकरी निर्णयावर ठाम राहिले.

संजय जाधव

बुडीत क्षेत्रातील उर्वरित १५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीसाठी दिरंगाई होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या उपस्थितीत करुन संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी प्रकल्पाच्या भिंतीवर आंदाेलन छेडले. यावेळी डिक्कर यांनी प्रकल्पाचे काम बंद पाडले. (Maharashtra News)

यावेळी डिक्कर यांनी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम चालु देणार नाही अशी भूमिका घेतली. प्रशांत डिक्कर यांनी आंदोलन स्थळी शेतकऱ्यांसोबत दोन तास चर्चा केली. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम चालु ठेवण्यासाठी विंनती केली. परंतु तोडगा न निघाल्याने शेतकरी निर्णयावर ठाम राहिले.

.अखेर प्रकल्पावर आंदोलन स्थळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी नरमाईची भुमिका घेत प्रकल्पावरील सर्व वाहने बंद करुन काम बंद केले..प्रकल्प पूर्ण व्हावा ही आमची भूमिकाच पण शेतकऱ्यांवर कदापी अन्याय सहन करणार नाही. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत दिक्कर यांनी दिलाय

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद वाढणार, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा

Crime News: आधी बुरखाधारी महिलेनं थांबवलं, नंतर नमाज वाचण्यासाठी जबरदस्ती अन्...; पालघरमधील महाविद्यालयात नेमकं काय घडलं?

Railway News : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्मचाऱ्यांच्या गणवेशात होणार मोठा बदल; रेल्वे मंत्री काय म्हणाले? वाचा

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

SCROLL FOR NEXT