Farmers agitation  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur : संपूर्ण राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन; काय आहेत मागण्या?

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

कोल्हापूर : बदलत्या वातावरणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका शेतातील पिकांना बसत आहे. या सारख्या विविध समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या विविध प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्वाभिनमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेत नसल्याचा आरोप करत स्वाभिनमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या (Farmers) हिताचे कोणतेच निर्णय घेत नसल्याने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाली आहे, अशी खदखद स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचं तसेच केंद्र सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने करणार आहेत.

कोल्हापूर आणि सांगली सीमेवर असणाऱ्या अंकली टोलनाका परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन होणार असून या आंदोलनात स्वतः माजी खासदार , स्वाभिमानी शेतकऱ्याचे संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) सहभागी होणार आहेत. हे आंदोलन दुपारी 12 वाजता होणार आहे. सध्या राज्यात बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन राज्यभर दुपारी बारा वाजता करण्यात येणार आहे.

काय आहेत मागण्या ?

शेतकरी नेते , माजी खासदार राजू शेट्टी यांनी ट्विट करत काही मागण्या राज्य सरकारपुढे मांडल्या आहेत. 'अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटात अडकलेल्या ४ लाख ८५ हजार नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सरकारने प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहनप अनुदान तातडीने जमा करावे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या व अन्यायी दरवाढ रद्द करून करून थकीत वीज बिलासाठी होत असलेली वीज तोडणी तातडीने थांबवा , अशा मागणीचा आशय राजू शेट्टी यांनी ट्विट केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT