Saam Tv
आपल्याला हॉटेल्समधले कबाब खायला आवडतात. मात्र तुम्ही सुद्धा तेच कबाब घरच्या घरी तयार करू शकता. चला तर जाणून घेऊ रेसिपी.
बटाटे, चणाडाळ, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरेपूड, गरम मसाला, हळद, मीठ, लाल तिखट, तांदळाचे पीठ किंवा बेसन, तेल इ.
सर्वप्रथम चणाडाळ स्वच्छ धुवून तासभर भिजत घाला. त्याचसोबत इतर भाज्या स्वच्छ धुवून घ्या.
आता डाळी आणि बटाटे प्रेशर कूकरमध्ये टाकून छान स्टीप करून घ्या.
आता सर्व जिन्नस, मसाले बटाट्याच्या मिश्रणात मिक्स करा. त्यात पीठ सुद्धा मिक्स करा आणि ते तुम्हाला हव्या त्या आकारात वळून घ्या.
आता कढईत तेल गरम करा आणि दोन ते तीन कबाब तळून घ्या. एकत्र कबाब टाकल्याने ते व्यवस्थित क्रिस्पी होणार नाही.
कबाबचा रंग सोनेरी झाला की एका प्लेट ते सर्व्ह करा. तयार आहेत स्ट्रीट स्टाईल कबाब.
NEXT: रिलेशनमध्ये सतत माफी मागावी लागत असेल थांबा अन्यथा...