Ravikant Tupkar Latest News Saam TV
महाराष्ट्र

Ravikant Tupkar News: 'सरकारला ईंगा दाखवू...' रविकांत तुपकरांचा इशारा; नागपूर अधिवेशनावर करणार हल्लाबोल आंदोलन

Maharashtra Farmer: सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या शब्दांच्या अंमलबजावणीला सुरुवात न केल्याने रविकांत तुपकरांकडून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा | ता. १६ डिसेंबर २०२३

Ravikant Tupkar News:

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या शब्दांच्या अंमलबजावणीला सुरुवात न केल्याने रविकांत तुपकरांकडून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. 'सोयाबीन-कापूस उत्पादकांचा इंगा काय असतो हे सरकारला १९ डिसेंबरला नागपूरात दाखवू...' असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी १००% नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या (Ravikant Tupkar) नेतृत्वाखाली गेल्या २ महिन्यांपासून सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.

सोमठाणा येथे रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन व मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी दिलेली धडक यामुळे राज्य सरकारने २९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत बहुतांश मागण्या त्यांनी मान्य केल्या होत्या. मात्र या मागण्यांची कार्यवाही अद्याप झाली नाही.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला १५ डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती. ती मुदत संपली पण सरकारने अद्याप आपल्या मागण्यांसंदर्भात अंमलबजावणीला सुरवात केली नसल्याने तुपकरांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

बैठकीत सरकारला दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानुसार १८ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावरील मेहकर जवळील फरदापूर टोल येथून शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना होतील व १९ डिसेंबर रोजी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT