Rohit Pawar: आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होत असताना सभागृहात फक्त एकच मंत्री उपस्थित, रोहित पवार सरकारवर बरसले

Maharashtra Winter Season: ''मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल किंवा इतर समाजाच्या आरक्षणाबाबत या दोन दिवसात चर्चा झालेली पाहिलं, मात्र त्या चर्चेवेळी एकच मंत्री सभागृहात उपस्थित होते'', असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
Rohit Pawar On Maharashtra Government
Rohit Pawar On Maharashtra GovernmentSaam Digital
Published On

>> नितीन पाटणकर

Rohit Pawar On Maharashtra Government:

''मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल किंवा इतर समाजाच्या आरक्षणाबाबत या दोन दिवसात चर्चा झालेली पाहिलं, मात्र त्या चर्चेवेळी एकच मंत्री सभागृहात उपस्थित होते'', असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत. नागरपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अशातच या महत्वाच्या प्रश्नावर चर्चा होत असताना, सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने त्यांनी नाराज व्यक्त केली आहे.

ते म्हणाले आहेत की, ''इतर मंत्री अधिवेशनात उपस्थित नसतात कुठेतरी जेवायला जातात आणि सगळे तिथेच बसतात. आरक्षणाचे महत्त्वाचे विषयावर बोलताना सहा मंत्री तरी सभागृहात असावेत ही आमची अपेक्षा.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rohit Pawar On Maharashtra Government
Varsha Gaikwad News: 'धारावीचा नाही, अदानींचा विकास', वर्षा गायकवाड यांचा विधानसभेत घणाघात

अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, ''अवकाळी पाऊस दुष्काळ बेरोजगारीचा मुद्दा यावर देखील चर्चा होणे आवश्यक आहे.'' ते म्हणाले, ''उत्तर प्रदेश गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली. पण महाराष्ट्रात गुंतवणूक खूप कमी झाली आहे. राज्यात केवळ 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, असा डेटा सांगतो.'' (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडीबद्दल वक्तव्य केलं होतं. यावर आपली प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, ''दादा असं काहीतरी बोलतील ही अपेक्षा नव्हती. कारण शेवटी ती गरिबांची पोर आहेत. सरकारला या मुलांना पाठिंबा देण्याची गरज आहे. पीएचडी करणं सोपं नाही.''

Rohit Pawar On Maharashtra Government
MLA Ramdular Gond: अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, BJP आमदाराला 25 वर्षांची शिक्षा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ललित पाटील प्रकरणावर बोलताना ते म्हणाले आहेत की, ''या सगळ्या प्रकरणी काही नेत्याची नावं आहेत का? हे तपासणे महत्त्वाचे आहे. याबाबत न्यायालयीन चौकशी व्हावी, ही आमची इच्छा आहे. ललित पाटील प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com