Breaking News , Nashik , Doctor , Wife , Love, Husband Saam tv
महाराष्ट्र

रायगडच्या समुद्रात चाललंय काय? पुन्हा संशयस्पद बोट आढळल्याने खळबळ; पोलीस तपास सुरु

समुद्रात आढळलेल्या बोटीला नंबर प्लेट नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. मत्स्य विभाग गस्त घालत असताना ही सापडली आढळली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड : रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरणमधील करंजा येथे समुद्रात संशयास्पद मासेमारी बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने समुद्रात आढळलेली बोट कोणत्या कटाचा भाग तर नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहेत. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

समुद्रात आढळलेल्या बोटीला (Suspicious Boat) नंबर प्लेट नसल्याने संशय व्यक्त केला जात आहे. मत्स्य विभाग गस्त घालत असताना ही सापडली आढळली आहे. नेमकी ही बोट कुणाची आहे याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दोन दिवसांपूर्वीही आढळली होती संशयास्पद बोट

दोन दिवसांपूर्वी दापोली समुद्रकिनारी अशीच संशयास्पद बोट सापडली होती. त्यानंतर तटरक्षक दलाच्या मदतीने याबाबची चौकशी करण्यात आली. यावेळी ही बोट संशयास्पद नसून विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाच्या लाईफ क्राफ्टचा तो भाग असल्याची माहिती तटरक्षक दलाकडून देण्यात आली.

गेल्या महिन्यात देखील रायगडच्या हरिहरेश्वरमध्ये समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळली होती. या बोटीत शस्त्रास्त्रं सापडली देखील सापडली होती. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ही बोट किनाऱ्यावर आणली होती. या बोटीमध्ये तीन एके-47 रायफल्स, काडतुसं आढळून आली होती. शस्त्रं आढळून आलेल्या बॉक्सवर नेपच्यून मॅरिटाईम सिक्युरिटीचं स्टिकर होतं. तेव्हा देखील मोठी खळबळ उडाली होती. रायगड जिल्ह्यात या घटनेमुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज मराठा समाजाची पुण्यात महत्त्वाची बैठक

राज्यात आज 'ड्राय डे', मद्यपींचे वांदे होणार! २२ हजार हॉटेल-बार आज बंद, सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडणार

MHADA Lottery 2025: खुशखबर! म्हाडाची तब्बल ५२८५ घरांसाठी लॉटरी, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु, कुठे कराल अर्ज?

Monday Horoscope : भगवान गणेशाची उपासना फलदायी ठरेल, अचानक धनलाभ होईल; ५ राशींच्या लोकाचं नशीब फळफळणार

Success Story: वडील वीट भट्टीवर कामाला; लेक २२ व्या वर्षी IPS झाला; सफीन हसन यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT