सभेतील गैरवर्तनाबाबत तालिका अध्यक्षांकडून भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन  Saam Tv
महाराष्ट्र

सभेतील गैरवर्तनाबाबत तालिका अध्यक्षांकडून भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन

पुढील एक वर्षासाठी या आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजचा दिवस हा माझ्यासाठी काळा दिवस आहे. आज जे घडल ते इतिहासात कधीही घडल नाही. सभागृहाच्या दालनात विरोधी पक्षातील सदस्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. ही बाब अत्यंत लांच्छनास्पद आहे, अशा शब्दांत सभागृहाचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी संताप व्यक्त केला. राज्याचे विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या (Monsoon Session) पहिल्या दिवशीच विधानसभेत ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) मोठा गोंधळ झाला. या मुद्द्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की झाली. यावरून तालिका अध्यक्षांनी विरोधी पक्षातील नेत्यांचे निलंबन करण्यात आले आहे. (12 BJP MLAs suspended by table president)

यानंतर तालिका अध्यक्षांनी भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केले आहे. यात संजय कुटे, राम सातपुते, अतुल भातखाळकर, अभिमन्यु पवार, जयकुमार रावल, नारायण कुचे, गिरीश महाजन, आशीष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर, कीर्तीकूमार भांगडिया, हरिष पिंपळे यांचे निलंबन केले आहे. सभागृहाची प्रतिमा खराब केल्याने या आमदारांवर ही करवाई करण्यात आली आहे. पुढील एक वर्षासाठी त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. मंत्री अनिल परब यांनी निलंबनाचा ठराव मांडला आणि अध्यक्षांनी तो मंजूर केला. इतकेच नव्हे तर भाजपा आमदारांनी अध्यक्षांशी देखील गैरवर्तन केल्यामुळे त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या गोंधळातच ओबीसी आरक्षणाचा इम्पेरील डेटा केंद्र सरकारकडून मिळावा, याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षात चांगलीच शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, अशी धक्काबुक्की झाली नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या गोंधळात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा ठराव मंजुरीसाठी टाकलयानंतर विरोधकांनी सभागृहात वेलमध्ये येऊन प्रचंड गोंधळ घातला. या गदारोळातच सभागृह अध्यक्षांनी ठराव मंजूर केला. या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Arrested: बलात्काराचा आरोप अन्...; 'या' प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला न्यायालयीन कोठडी, वाचा नेमकं प्रकरण

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

SCROLL FOR NEXT