Sushma Andhare questions Eknath Shinde’s alleged links in the Kharat case, demands call record investigation. Saam Tv
महाराष्ट्र

'एकनाथ शिंदेंचे फोन कॉल तपासा' विकृत भोंदूबाबाला कोणाचं अभय?

Nashik Fake Baba Ashok Kharat Political Links: नाशिकच्या कॅप्टन खरात प्रकरणाची धग आता राजकीय नेत्यांपर्यंतही पोहचली लागलीय... अशातच सुषमा अंधारेंनी खरात प्रकरणावरून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधालय... त्यामुळे शिंदेंच्या सीडीआरवरून कसं राजकारण तापलयं... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून......

Suprim Maskar

कॅप्टन म्हणून घेणाऱ्या भोंदूबाबा खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक बाहेर येतायत...अशात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खरातसोबतचे व्हायरल फोटो चर्चेचा विषय ठरल्येत...खरातचं राजकीय कनेक्शन विरोधकांनी चांगलंच उचलून धरलयं... त्यामुळे एकनाथ शिंदेंसह इतर नेत्यांचे सीडीआर तपासण्याचं धाडस गृहखातं करणार का? असा सवालच ठाकरेसेनेच्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय...

दरम्यान भोंदू बाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेतलाय..2022 ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅप्टन खरातच्या भेटीसाठी आले होते तेव्हा अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या भेटीच्या विरोधात आवाज उठवला होती. मात्र त्यावेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांवर मंत्र्यांकडून आणि ओएसडीकडून दबाव टाकला गेला होता.याच संर्दभात अंनिसच्या सदस्यांनी SIT प्रमुख तेजस्विनी सातपुतेंची भेट घेऊन खरातच्या कृष्णकृत्यांचा पाढाच वाचला..

कोल्ह्याचे कान आणि शिंगाचा तांत्रिक विधीसाठी वापर करायचा..तसंच भक्तांना सुगंधी कस्तुरी देऊन फलप्राप्ती आमिष दाखवायचा..एवढंच नाही तर खरातच्या भक्तांकडून अंनिसच्या कार्यकर्त्यांना धमकीही दिली गेली होती आणि विरोध केल्यानं अंनिसच्या कार्यकर्त्यांवर पिस्तुलही रोखली होती.

आता खरातची खरी कुंडली पोलिसांच्या हाती आलीय. अंधश्रद्धेचा हा बाजार मांडणाऱ्या 'कॅप्टन' खरातला कोणाचं अभय आहे? खरातच्या अघोरी विधींसाठी वन्यजीवांची तस्करी कोण करत होतं? सत्तेतील नेते, मंत्री अशा भोंदू बाबाच्या चरणी नतमस्तक का होत होते? खरातचे राजकीय कनेक्शन नेमकं कसं वाढलं? याचा SIT तून सखोल चौकशी होणं गरजेचं आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

Titwala Crime: परप्रांतियांची मुजोरी! मराठी कुटुंबाला सळई- काठीने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra News Live Update: नवले पुलावर चारचाकी वाहनाला आग, पूल परिसरात वाहतूक कोंडी

Nashik: नायब तहसीलदाराला अटक, म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई

Crime News: एकीकडे नातेवाईकाच्या लग्नाची धामधूम सुरू; दुसरीकडे सासू अन् जावई शेतात सापडले नको त्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT