sushant metkari along with his family and electric bicycle saam tv
महाराष्ट्र

वडिलांची पायपीट थांबण्यासाठी मुलगा झाला संशाेधक; बनवली Electric Bicycle

सुशांतने तयार केलेल्या सायकलवर सर्वजण बेहद खूष आहेत.

विजय पाटील

सांगली : पेट्रोल (petrol) महागल्याने आणि कामावर पायी जाणाऱ्या वडिलांसाठी (father) जुगाड करत मुलाने (child) चक्क इलेक्ट्रिक सायकल (electirc bicycle) तयार केली आहे. ही सायकल दाेन तास चार्ज केल्यानंतर 50 किलाेमीटर पर्यंत चालते असा दावा सुशांत मेटकरी (sushant metkari) याने केला आहे. (sangli latest marathi news)

सुशांत मेटकरी हा (sangli) वांगी गावात राहताे. त्याचे वडिल दरराेज वाहनाने (vehicle) कामावर जात हाेते परंतु पेट्राेलचे दर वाढल्याने त्यांनी पायी जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुशांतने वडिलांसाठी एखादी सायकल (bicycle) घेण्याचा विचार केला. त्यानंतर पुन्हा त्याने स्वतः सायकल विकसीत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

sushant metkari bicycle

घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असताना सुशांतने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती केली. त्याने त्यासाठी सायकलला 12 व्होल्टच्या दाेन बॅटरी जोडल्या. या बॅटरी दाेन तास चार्ज केल्यानंतर सायकल सुमारे 50 किलाेमीटर चालते असा दावा त्याने केला आहे.

sushant metkari

आता या सायकलवरुन त्याचे वडील दत्तात्रय दरराेज कामावर जातात. सुशांत देखील वेळ पडल्यास सायकल वापरताे. सुशांतने तयार केलेल्या सायकलवर सर्वजण बेहद खूष आहेत. त्याचे कुटुंबियांबराेबरच (wangi) ग्रामस्थ देखील काैतुक करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT