Sushama Andhare New Saam TV
महाराष्ट्र

Sushama Andhare News: ठाण्यात वाजवली ती दंगलगाणी आहेत; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून सुषमा अंधारेंची शिंदे गटावर टीका

Sushama Andhare News: अशी दंगलगाणी पहाटे वाजवणे तुमच्या संस्कृतीमध्ये बसतं का? असा खरमरीत सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

Ruchika Jadhav

Sushama Andhare News:

दिवाळी निमित्त रविवारी ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचा जंगी दिवाळी पहाट कार्यक्रम पार पडला. शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा कार्यक्रम देखील ठेवला होता. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी टीकास्त्र सोडलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिवाळीमध्ये पहाटेची वाजवतात ती मंगलगाणी असतात तुम्ही ठाण्यात वाजवली ती दंगलगाणी आहेत. अशी दंगल गाणी पहाटे वाजवणे तुमच्या संस्कृतीमध्ये बसतं का? असा खरमरीत सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.

पुढे त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून शिंदे गटाला टोला लगावला आहे. यात त्यांनी म्हटलं की "ही संस्कृती तुम्हाला दिघे साहेबांनी शिकवली का? ही संस्कृती तुम्हाला बाळासाहेबांनी शिकवली का? दंगलगाणी वाजवून तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं लागतं."

"गर्दी महाराष्ट्रात नळावरच्या भांडणालाही जमते. शिंदे गटाकडे वैचारिकांची नैतिक अधिष्ठा नाही हे प्रत्येकवेळेस सिद्ध होतं. पहाटे वाजवलेल्या दंगलगाण्यांमुळे अधिक स्पष्ट झालं इतकंच.", असंही सुषमा अंदारे यावेळी म्हणाल्या.

दिवाळी पहाटच्या निमित्ताने कायम मंगल गाणी आणि मंगल स्वर कानी पडावे असा एक प्रघात आहे. ज्याने विचारलं की तुम्ही कधी दिवाळी पहाट केली का? तर परळीमध्ये कधीतरी या सातत्याने गेले 20- 22 वर्ष मराठवाडा साथी परिवार अतिशय सुंदर असा दिवाळी पहाटचा कार्यक्रम आयोजित करतात, असं अंधारे म्हणाल्या.

लावणी, पोवाडा,भावगीत, भक्ती गीत, गजल, भूपाळी, भारुड, गोंधळ, अंगाई ही सगळी महाराष्ट्राची लोककला आहे. सगळ्याच गोष्टींबद्दलचा आम्हाला नितांत आदर आहे. परंतु एक उत्तम वाजंत्रीकार जो लग्नाचाही वाजवू शकतो आणि मळ्यातही वाजवू शकतो नियम असा आहे की मढ्याच्या ठिकाणी लग्नाच्या वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मढ्याचं वाजवू नये, अशा शब्दांत सुषमा अंधारेंनी शिंदे गटावर आगपाखड केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT