suresh dhas lawrence bishnoi saam tv
महाराष्ट्र

Suresh Dhas : बिश्नोईचा 'धस'का, धसांच्या जीवाला धोका? खोक्याआडून रचला हत्येचा कट, सुरेश धसांचा मोठा गौप्यस्फोट

Suresh Dhas News : बीड जिल्ह्यात बिहारला लाजवेल अशा घटना घडत आहेत.. त्यातच आता सुरेश धसांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा गौप्यस्फोट केलाय.... त्याचे तीव्र पडसाद उमटलेत.. यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट....

Yash Shirke

सुरेश धस - मुक्काम पोस्ट, जामगाव, ता. आष्टी जिल्हा, बीड...

लॉरेन्स बिश्नोई - मुक्काम पोस्ट- गुजरातमधील साबरमती जेल...

सुरेश धस आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यात 697 किलोमीटरचं अंतर... मात्र सुरेश धसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगचा धसका घेतल्याचं समोर आलंय.. त्याला कारण ठरलाय धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसले... खोक्या भोसलेने हरीण मारलं आणि त्याचं मटण सुरेश धसांनी खाल्ल्याचा आरोप करण्यात आलाय.. त्यामुळेच बिश्नोई समाजात आपल्याला व्हिलन ठरवून आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप सुरेश धसांनी केलाय...

लोकप्रतिनिधीच्याच हत्येचा कट रचला जात असेल तर त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं केलीय.. तर अंजली दमानियांनी धसांना हिंदी चित्रपट कमी पाहण्याचा सल्ला दिलाय... संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुरेश धसांनी मोर्चा उघडला होता..

त्यात अखेर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला...या राजीनाम्यानंतर खोक्या भोसलेचे कारनामे समोर आले. यात खोक्या भोसलेने हरीण आणि काळविटांची शिकार केल्याचा आरोप करण्यात आला होता.. तोच धागा पकडून बिश्नोई गँगने माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत धसांनी परळीकडे बोट दाखवलय.. मात्र बिश्नोई गँगची या प्रकरणात एण्ट्री का झाली? पाहूयात....

सुरेश धस बिश्नोई समाजाच्या निशाण्यावर?

- खोक्या भोसलेने हरणांची शिकार केल्याचा आरोप

- हरीण आणि काळविट बिश्नोई समाजासाठी पूजनीय

- खोक्या भोसलेकडून धसांनी हरणाचं मांस खाल्ल्याचा आरोप

- हरणाचं मांस खाल्ल्याच्या आरोपामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या

सुरेश धसांनी हे प्रकरण मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत पोहचवणार असल्याचं म्हटलंय.. त्यामुळे बीडमधील अंडरवर्ल्ड सर्वसामान्यांच्या हत्येचा कट रचण्यापुरतं मर्यादित न राहता थेट लोकप्रतिनिधींच्या हत्येचे कट रचण्यापर्यंत गेलंय का? याचीच चर्चा रंगलीय.. त्यामुळे धसांच्या आरोपांची सखोल चौकशी होणार का? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये वाघाचा मुक्त संचार, पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

SCROLL FOR NEXT