Sanjay Raut Allegation On Suresh Dhas 
महाराष्ट्र

Sanjay Raut: सरपंच देशमुख हत्याप्रकरणात धसांची डील पक्की; संजय राऊतांचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

Sanjay Raut Allegation On Suresh Dhas : सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले. ज्या वेगाने ज्या वेगाने त्यांनी आकाच्या आकावर हल्ले केले. आता त्याला अचानक ब्रेक लागला. त्यावरून संजय राऊत यांनी धस यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

Bharat Jadhav

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्यायासाठी सुरेश धस यांनी मोठे रान पेटवले होते. आता तेच संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. सुरेश धस यांची डील झालीय, त्यामुळे देशमुख प्रकरणाला ब्रेक लागलाय, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

भाजप आमदार सुरेश धस यांनी सरपंच हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंना घेरलं होतं. त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. मुंडेंचे नीकटवर्तीय वाल्मिक कराड याचा सरपंच हत्या प्रकरणात समावेश असल्यावरून धस यांनी धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण काही दिवसापुर्वी सुरेश धस आणि मुंडेंची गुपचूप भेट झाल्याची बातमी समोर आली. त्यानंतर सुरेश धस यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान धस यांच्या आरोपांची धार कमी झालीय. संजय राऊत यांनी त्यावरून धस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात बसलंय.

काय केला आरोप

डिल झालीय, सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगाने ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले. ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला, आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचा भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं.

धस आरोप मागे घेणार?

सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मागे हात धुवून लागलेले सुरेश धस हे आरोप मागे घेतील अशी शंका राऊतांनी उपस्थित केलीय. मला एका प्रमुख माणसाने सांगितलं की, सुरेश धस मागे घेतील. ती त्यांची परंपरा आहे. एखादी मोठी डील पदरात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

सुरेश धस यांना बॉसने अडकवलं?

धस आणि मुंडे भेटीवरून बोलताना संजय राऊत म्हणाले, ते कोणाला भेटायला जात आहे. हे त्यांना समजलं पाहिजे होतं. इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटायला जावे. हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचे असल्याचे राऊत म्हणाले. बावनकुळे त्यांचे बॉस आहेत असे ते म्हणतात. देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या बॉस आहेत मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? असा सवाल देखील राऊत यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार यांची महात्मा फुले वाड्याला भेट

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

SCROLL FOR NEXT