Supriya Sule on Ajit Pawar and Sharad Pawar together NCP  Saam Tv News
महाराष्ट्र

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पवार साहेब बोलले असतील तर...; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule : 'मी काय ते वाचलेलं किंवा ऐकलेलं नाही. मी काल दिल्लीमधील ऑल पार्टी मीटिंगमध्ये होती. त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो नवीन कायदा येतोय, त्याच्याबद्दल काल मीटिंग होती, त्यामुळे काल रात्री उशिरापर्यंत त्याच कामात मी व्यस्त होती.'

Prashant Patil

सातारा : सध्या राज्यातील राजकारणात एक मुद्दा फार चर्चेत आहे, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षासोबत जावं, असा एक मतप्रवाह पक्षात असल्याचं खुद्द शरद पवार यांनी सांगितलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं. त्याशिवाय पवार म्हणाले की, 'केंद्रात विरोधीपक्षात बसायचं की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी यांनी एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून ठरवावं, असंही ते म्हणाले. तसेच, विचारधारा एकच असल्याने भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असंही पवार म्हणाले. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'मी काय ते वाचलेलं किंवा ऐकलेलं नाही. मी काल दिल्लीमधील ऑल पार्टी मीटिंगमध्ये होती. त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो नवीन कायदा येतोय, त्याच्याबद्दल काल मीटिंग होती, त्यामुळे काल रात्री उशिरापर्यंत त्याच कामात मी व्यस्त होती. रात्री उशिरा मी पुण्यात आली आणि सकाळी उठून साताऱ्यामध्ये आली. या सगळ्या घडामोडींची माहिती सविस्तर घेऊन सांगेल', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

'हा मुद्दा ना माझ्या ऐकण्यात ना वाचण्यात आला. या दोन्ही वाचून नक्की कळवेल, मला यातील काहीच माहिती नाही. तरी पवार साहेब ज्या गोष्टी बोलले असतील , तर त्याच्यावर कसं काय बोलणार. जोपर्यंत माझी चर्चा होत नाही, काय स्टेटमेंट आलं, कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आलं, सगळी माहिती घेतल्याशिवाय कसं काय बोलणार, मला याची काहीच माहिती नाही, सविस्तर माहिती घेऊन तुम्हाला कळवेन', अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

'अनेक ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये अनेक एवढे महाराष्ट्राच्या नेत्यांच्या गाठीभेटी होत असतात. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असेल. दुसऱ्याला आनंद देण्यात नेहमीच आनंद असेल. सगळ्यांशी चर्चा केल्याशिवाय माझी एकट्याचा विषय आहे का? संघटनेत जेव्हा काम करतो, पहिले पवार साहेब कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये होते. त्यांनी इंटरव्यू कुठे दिला सगळ्यांची माहिती घेऊन सर्वांशी चर्चा केल्याशिवाय मी कशी काय बोलणार. संघटनेत काम करताना आपण जे बोलतो ते मोजून मापून बोललं पाहिजे. जबाबदारीने बोललं पाहिजे. मला वाटतं की अशा परिस्थितीत आमच्यासारख्या लोकांनी जेवढं कमी बोलेल तेवढं संयुक्तिक ठरेल'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

Dia Mirza: दिवाळी स्पेशल अभिनेत्री दीया मिर्झाचा शाही लूक, पाहा PHOTO

Pakistan Attack News : पाकिस्तानवर भीषण हल्ला; बलूचिस्तान-तालिबान्यांच्या हल्ल्यात १० सैनिकांचा मृत्यू

Lakshmi Puja Thali: देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आरतीच्या ताटात या वस्तू जरूर ठेवा

Maharashtra Live News Update : मुलीच्या छेडछाडनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट

SCROLL FOR NEXT