बोगस लाभार्थ्यांमुळे चर्चेत आलेली लाडकी बहीण योजना आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलीय.. लाडकीचा निधी भावांनी आणि सरकारी लाडक्यांनी पळवल्य़ावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं.. त्यात आता लाडकी बहिण योजनेत तब्बल 4900 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय...
दरम्यान याचं लाडकीमुळे राज्याच्या तिजोरीवर भार वाढत असून वर्षअखेरपर्यंत कर्जाचा आकडा 9 लाख 32 हजार कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय... दुसरीकडे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारला एकूण कर्जावरील व्याजापोटी 65 हजार कोटी द्यावे लागणार आहेत. गेल्या चार वर्षात व्याजापोटी किती हजार कोटी भरावे लागले आहेत ते पाहूया...
(आकडे कोटींमध्ये)
2022-23
41, 689
2023-24
45,652
2024-25
54,687
2025-26
64,659
याआधी स्टेट बँक ऑफ इंडियानंही एका अहवालात लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे महाराष्ट्र सरकारची आर्थिक घडी विस्कटू शकते असं स्पष्ट केलं होतं. त्यातच मंत्र्यांच्या मतदारसंघातच हजारो बोगस लाडकींना लाभ मिळाल्याचं उघड झालं होतं त्यामुळे निवडणुकीच्या काळात घोषित झालेल्या आणि पुढे विरोधकांच्या आरोपांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या लाडकी बहीण योजनेतला घोटाळयाचा आरोप खरा आहे का..? तसं असेल तर या घोटाळ्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.