Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court Live
Eknath Shinde vs Uddhav Thackeray Shiv Sena Hearing Supreme Court Live Saam Tv
महाराष्ट्र

Udhav Thackeray Vs Eknath Shinde: सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली; पाहा दोन्ही गटाचे युक्तीवाद....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi: शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची लढाई सध्या सुप्रीम कोर्टात सुरु असून आजच्या दिवसाची सुणावणी संपली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या सत्ता संघर्षात कुणाचा विजय होणार, हा निकाल येत्या काही दिवसातच लागणार आहे. यावेळी ठाकरे गटाकडून आज सकाळच्या सत्रात युक्तीवाद केला. तर दुपारच्या सत्रात शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. (Maharashtra Political Crisis)

ठाकरे गटाचा युक्तीवाद..

आजच्या सुणावणीमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपने सरकार बनवण्यासाठी राज्यपालांनी नियमांच्या कक्षा ओलांडून त्यांना मदत केली. असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाने नेमलेले पक्ष प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीदेखील बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी हा युक्तिवाद केला.

ठाकरे गटाचे तिसरे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करताना आपण प्रतोदाच्या नियुक्तीबाबत मुद्द्यावर युक्तिवाद करणार असल्याचं देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीशांना सुरुवातीलाच निदर्शनास आणून दिले. यात शिंदे गटाकडून लेटरपॅडवर शिवसेना विधीमंडळ पक्ष असा उल्लेख केला गेला असल्याचं देवदत्त कामत यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

शिंदे गटाचा युक्तीवाद...

दुपारच्या सत्रात शिंदे गटाकडून युक्तीवाद करण्यात आला. यामध्ये आमदारांनी जे निर्णय घेतले, ते विधिमंडळातील सदस्यांच्या बहुमताने घेतले आहेत. त्यामुळे हे निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द करू नये, अशी मागणी नीरज कौल यांनी केली. तसेच नबाम रबिया केसमध्ये आमदारांच्या जीवाला धोका होता. तसे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करू नये, अशी मोठी मागणी शिंदे गटाच्या वकिलांमार्फत करण्यात आली.

यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना असलेला पाठिंबा काढला. त्यामुळेच राज्यपालांनी पक्षात फूट आहे, असे मानले. ठाकरेंवर विश्वास नाही, असे आमदार म्हणाले. त्यामुळेच बहुमत चाचणीचा निर्णय राज्यपालांनी घेतला. बहुमत चाचणी घेणं, हे राज्यपालांचं कर्तव्यच आहे, असं वक्तव्य नीरज कौल यांनी केलं. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

Beer Bar परवाना देण्यासाठी घेतली सव्वातीन लाखांची लाच, अधिका-यास अटक

Akola Crime News : अकोल्यात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा; बहिणीनेच सख्या भावांची आणि भाच्यांची केली होती हत्या

Bhor Mahad ghat road : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! भोर-महाड महामार्गावरील वरंध घाट बंद, कारण...

Delhi Liquor Policy Case : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच होणार कारवाई? चार्जशीट दाखल करण्याचं काम सुरू

SCROLL FOR NEXT