Supreme Court hearing on Shiv Sena dispute as judges caution against irresponsible political remarks. saam tv
महाराष्ट्र

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

Supreme Court Warning To Thackeray Faction Over Statements: शिवसेना पक्ष चिन्ह वादावर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला फटकारले. बेजबाबदार वक्तव्ये थांबवण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी 30 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

Omkar Sonawane

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची संबंधित याचिकावर सुप्रीम कोर्टात आज ता. (15) सुनावणी पार पडली. आजच्या या सुनावणीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ठाकरेसेनेचे वकील देवदत्त कामत यांना चांगलेच सुनावले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वकिलांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. सुनावणीवेळी वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्याने त्यावर तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वातआधी तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट निर्णय घेत नाही असे बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा असे सारन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटले. तसेच शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होईल, असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले.

सुनावणीसाठी आम्ही तयार- देवदत्त कामत

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने हजर असलेले वकील देवदत्त कामत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाच्या सोयीनुसार ते या प्रकरणावर युक्तिवाद करण्यास तयार आहेत. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्हाला युक्तिवाद करायचा नाहीये, तुम्हाला फक्त विधाने करायची आहेत. जेव्हा प्रकरण सुनावणीसाठी घेतले जाते, तेव्हा तुम्ही तारीख निश्चित करायला सांगता. आणि आम्ही तारीख दिली की, हे ठराविक राजकीय नेते अशी विधाने का करत आहेत?

सरन्यायाधीशांनी पुढे म्हटले की, न्यायालय या प्रकरणात सर्व पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा करते. ॲडव्होकेट कामत यांनी सांगितले की, न्यायालयाला जेव्हा पुरेसा वेळ मिळेल तेव्हा पूर्णवेळ सुनावणीसाठी तारीख निश्चित केल्यास त्यांच्या पक्षाला काहीही अडचण नाही. ते म्हणाले, आम्ही यासाठी उत्सुक आहोत कारण आम्ही गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत आहोत.

अशी विधाने करण्याचा कोणालाही अधिकार नाही

दुसऱ्या बाजूने शिंदेसेनेचे हजर असलेले वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, कोणत्याही पक्षाच्या नेत्याला न्यायालयाविरुद्ध अशी विधाने करण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या बाजूने असे काहीही करण्यात आलेले नाही.रोहतगी म्हणाले, न्यायालयावर किती ताण आहे हे आम्हाला माहिती आहे. आमच्या बाजूने असे काही झालेले नाही. कोणत्याही बाजूने अशी विधाने केली जाऊ नयेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT