Supreme Court hearing today on curative petition filed by state government regarding Maratha reservation Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा आरक्षण वैध की अवैध? आज अंतिम फैसला; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

Curative Petition on Maratha Reservation: मराठा समाजासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण, मराठा आरक्षण वैध की अवैध? याचा अंतिम फैसला आज होणार आहे.

Satish Daud

Maratha Reservation Supreme Court Hearing

मराठा समाजासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण, मराठा आरक्षण वैध की अवैध? याचा अंतिम फैसला आज होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५ मे २०२१ रोजी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) पाच पाचसदस्यीय घटनापीठाने मराठा समाजाला दिलेले आरक्षण अवैध्य ठरवले होते. इतकंच नाही, तर मराठा समाज मागासलेला असून त्यांना आरक्षण देण्यात यावं, अशी शिफारस करणारा न्या. गायकवाड समितीचा अहवाल कोर्टाने फेटाळून लावला होता.

मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देताना इंद्रा साहनीप्रकरणी घालून दिलेली ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली. त्यामुळे आरक्षण देता येणार नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं होतं. संसदेने १०२ वी घटनादुरुस्ती केल्यावर राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असाही निष्कर्ष कोर्टाने नोंदविला होता.

सुप्रीम कोर्टाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजाचा हिरमोड झाला होता. मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी राज्य सरकारने कोर्टात वकिलांची मोठी फौज उभी केली होती. मात्र, तरीही त्यांना अपयश आलं होतं. दुसरीकडे आरक्षणाच्या विरोधी बाजूने वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी बाजू मांडली होती.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेली आंदोलने आणि मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने शेवटचा प्रयत्न म्हणून सुप्रीम कोर्टात क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पीठापुढे ही सुनावणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT