Maharashtra Political Crisis Saamtv
महाराष्ट्र

Supreme Court Hearing: शिंदेंना मोठा झटका; भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर, सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण

Supreme Court Hearing On Bharat Gogawale: सर्वाेच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा अंतिम निकाल आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Political Crisis: सर्वाेच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा अंतिम निकाल आहे. (Supreme Court Final Decision on Shivsena Case) या निकालाकडे राज्यासह देशातील राजकारण्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात निकालाचे वाचन सुरू असून न्यायाधीशांनी भरत गोगावले यांची पक्षप्रतोदपदी झालेली नेमणूक ही बेकायदेशीर असल्याचे सर्वात मोठे निरीक्षण नोंदवले आहे.

काय आहे कोर्टाचे निरीक्षण...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात वाचनाला सुरूवात झाली आहे. अध्यक्षांच्या अधिकारचं प्रकरण ७ न्यायमूर्ती यांच्या पिठाकडे देण्यात आलं. या निकालाचं फेरविचार करण्यात य़ावा असं न्यायमुर्तींनी म्हंटलं आहे. तसेच शिंदे गटाचे प्रतोद बेकायदेशीर असल्याचे म्हणत कोर्टाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. (Latest Marathi News)

सुनील प्रभू यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीचा आदेश 22 जून रोजी काढला. या आदेशाला एकनाथ शिंदे यांनी विरोध केला आणि त्याच दिवशी ट्वीट करून शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती केली. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. गटनेत्यापेक्षा राजकीय पक्षाचा व्हीप महत्वाचा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. (Maharashtra Political Crisis)

मीच खरी शिवसेना हा दावा चुकीचा...

तसेच "मीच खरी शिवसेना असा दावा कुणीही करु शकत नाही. अपात्रतेपासून बचाव करण्यासाठी आम्हीच खरी शिवसेना असे म्हणणे चुकीचे आहे. तो दावा कोर्टानं बाद ठरवला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला (Eknath Shinde) एका पाठोपाठ एक मोठे धक्के दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur Vidhan Sabha : शहापूरमध्ये मोठी घडामोड; जयंत पाटलांच्या भेटीनंतर बबन हरणेंचा मविआला पाठींबा

Money Astrology: या राशींचे लोक होणार धनवान, रखडलेले पैसेही हातात मिळणार

Jayant Patil: भरणेसारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करा, जयंत पाटील यांचं मोठं विधान

Maharashtra News Live Updates: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आज नागपुरात रोड शो

Aishwarya Narkar: निळ्या साडीतील ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून म्हणाल स्वप्नसुंदरी...

SCROLL FOR NEXT