- विजय पाटील / सचिन बनसाेडे / मंगेश माेहिते
Maharashtra Political Crisis : सर्वाेच्च न्यायालयात आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा अंतिम निकाल आहे (Supreme Court Final Decision on Shivsena Case). या निकालाकडे राज्यासह देशातील राजकारण्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान हा निकाल आमच्या बाजूनेच लागेल असा विश्वास शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सर्व आमदार व्यक्त करीत आहे. सांगलीचे खानापूर तालुक्यातील आमदार अनिल बाबर (mla anil babar) हे त्यांच्या मतदारसंघात विविध लग्नकार्यात व्यस्त आहेत. साम टीव्हीशी बाेलताना त्यांनी माझ्या वाट्याला जय पराजय हा आहेच. तो मी मान्य करतो. निकाल जो असेल तो मान्य करेन आणि पुन्हा लोकांच्या दारात जाईन असे नमूद केले. (Maharashtra News)
...तर शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे परततील : विजय वडेट्टीवार
दरम्यान आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध राजकीय नेते त्यांचे मत व्यक्त करीत आहेत. काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) म्हणाले जर कायद्यानुसार, संविधानानुसार बघायला गेलं तर आम्हांला अपेक्षा आहे. परंतु ज्या पद्धतीने हा सगळा घटनाक्रम झाला हा निकाल सत्ताधारी यांच्या विरोधात आहे असे मला वाटत आहे.
वडेट्टीवार पुढं म्हणाले सरकारच घटनाबाह्य निर्माण झाल्याची भावना अनेकांची आहे. निकाल आमच्या बाजूने आल्यास आणखी काही बाहेर गेलेले शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतात असा दावा देखील त्यांना केला. अरुणाचल प्रदेशात जो काही निर्णय झाला तसाच निर्णय अपेक्षित आहे असेही विजय वडेट्टीवार यांनी नमूद केले.
सरकार पाडण्याची पद्धत बंद व्हावी : बाळासाहेब थोरात
आजचा निकाल महत्वाचा. पक्षांतर्गत बंदी कायदा आहे, त्याचा मुख्य हेतूच असा आहे की ज्या पक्षाकडून ज्या चिन्हावर निवडून आलो आहोत त्याच्याशी बांधिलकी राहिली पाहिजे. सरकार पाडण्याची पद्धत कुठे तरी बंद झाली पाहिजे अशी भावना काॅंग्रेस नेते आमदार बाळासाहेब थाेरात (balasaheb thorat) यांनी व्यक्त केली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.