Sharad Pawar and Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याने CM शिंदेंना वाचवले! शरद पवारांचे 'ते' भाकीत अखेर खरं ठरलं

Supreme Court Hearing On Shivsena MLA: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता, असे न्यायालयाने केली आहे.

Gangappa Pujari

Supreme Court Hearing on ShivSena: राज्याच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आल्याचे म्हणले आहे.

तत्पुर्वी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांचे भाकीत खरे ठरल्याची चर्चा रंगली आहे. काय होते शरद पवार यांचे भाकित जाणून घेवूया सविस्तर..

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याच्या सत्ता संघर्षावरील (Maharashtra Political Crisis) निकाल अखेर जाहीर झाला. ज्यामध्ये उद्धव ठाकर (Udhav Thackeray) यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता, असे महत्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळेच सरकार अडचणीत आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

काय म्हणाले होते शरद पवार...

तत्पुर्वी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांनी लोक माझे सांगाती’ या पुस्तकात देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचा उल्लेख केला होता. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले होते.

नबाम रेबिया प्रकरण ७ न्यायमुर्तींकडे...

नबाम रेबिया प्रकरणाचा फेरविचार केला पाहिजे. त्यामुळे हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या मोठ्या घटनापीठाकडे पाठवणार आहे. २७ जूनचा निकाल नबाम रेबियानुसार नव्हता त्यामुळे नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग अध्यक्षांच्या अधिकाराच प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनपीठाकडे देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule : पोर्शे गाडी प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

SCROLL FOR NEXT