Sanjay Raut On Supreme Court: सुप्रीम कोर्टाची पहिली 3 निरिक्षण महत्वाची, संजय राऊतांनी नेमकेपणाने सांगितलं

Latest News: संजय राऊत यांनी व्हीपबाबतच्या निरीक्षणाचे कौतुक करत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut saam tv
Published On

Mumbai News: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी व्हीपबाबतच्या निरीक्षणाचे कौतुक करत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहे. तसंच, 'जर थोडी नैतिकता असेल तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा.', असे मत व्यक्त केले.

Sanjay Raut
SC On Bhagat Singh Koshyari: राज्यपालांनी अधिकारांचा अमर्याद वापर केला, भगतसिंह कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने ओढले ताशेरे

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'कोर्टाच्या निरिक्षणावरुन ते सरकार बेकायदेशीरपणे घालवले. हे सरकार १०० टक्के घटनाबाह्य आहे. 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येत असेल तर येऊद्या. व्हीपच बेकायदेशीर आहे. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे मग विधानसभा अध्यक्षांनी बेकायदेशीर प्रक्रियेवर आपली भूमिका घ्यायला पाहिजे. आपला देश घटनेनुसार, लोकशाहीनुसार चालणार असेल तर विधासभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा.'

'शिंदे-फडणवीस सरकारने उगाच पेठे वाटू नये. त्यांच्या लोकांनी सरकार टिकलं म्हणून नाचक सुटू नये. जर थोडी नैतिकता असेल आणि खोक्यांची पापं धुवून काढायची असेल तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा.' असे मत व्यक्त करत त्यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

Sanjay Raut
Supreme Court Final Decision on Shivsena Case: शिंदे सरकार वाचले, CM पदाचा राजीनामा देऊन उद्धव ठाकरे फसले; सुप्रीम कोर्टानं निकाल वाचताना काय सांगितलं?

'सुप्रीम कोर्टाचा निकाल देशाच्या लोकशाहीला आणि महाराष्ट्राला दिशा देणारा आहे. आम्ही सुप्रीम कोर्टाचे आभारी आहोत. सुप्रीम कोर्टाचे पहिले तीन निरिक्षणं महत्वाची आहेत. शिंदे गटाने नेमलेले व्हीप बेकायदेशी आहे. सुनिल प्रभू हेच कायदेशीर व्हीप असल्याचे निरिक्षण कोर्टाने दिले असेल. तर त्यानुसार हे आमदार बेकायदेशीर ठरले आहेत. फक्त हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यायचा आहे. विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर व्हीपचे पालन करुन शकत नाही.', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'हे सरकार बेकायदेशीर आहे. राज्यपालांच्या सूचनेनुसार बहुमत चाचणी झाली. त्यानंतर व्हीप बजावण्यात आले. हे सर्व बेकायदेशीर ठरत असेल तर कायदेशीर काय आहे.' असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com