ऐन पुरात अंधश्रद्धेचा बाजार! जीव धोक्यात घालून अट्टहास (पहा व्हिडीओ) Saam Tv
महाराष्ट्र

ऐन पुरात अंधश्रद्धेचा बाजार! जीव धोक्यात घालून अट्टहास (पहा व्हिडीओ)

चक्क पुराच्या पाण्यामध्ये जीव धोक्यात घालून पूजाविधी करण्याचा धक्कादायक समोर आल आहे

अभिजित सोनावणे

अभिजित सोनावणे

नाशिक : नाशिकमध्ये Nashik गोदावरीच्या Godavari पाण्यात अंधश्रद्धेचा बाजार पाहायला मिळाला आहे. चक्क पुराच्या पाण्यामध्ये जीव धोक्यात घालून पूजाविधी करण्याचा धक्कादायक समोर आल आहे . 22 जुलैला हा संपूर्ण प्रकार घडला.

मुसळधार पावसामुळे Rain गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली असतांनाही काही महिला आणि पुरुषांकडून नदीपात्रात हा पूजाविधी सुरू होता. यावेळी लहान मुलंही त्यांच्यासोबत होती. सुदैवानं यावेळी कोणतीही दुर्घटना घडलेली नसली, तरी अशा पद्धतीने जीव धोक्यात घालून पूजाविधी करण्याचा अट्टाहास कशासाठी? राज्यातील अंधश्रद्धेचे हे प्रकार थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अश्या नागरिकांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करावी, व जादूटोणा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

तर संबंधित व्हिडीओ मध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये पुरामुळे वाढ झालेली दिसून येत आहे. अश्यावेळी त्या ठिकाणी अंधश्रद्धेचा बाजार भरलेला दिसून येत आहे. अतिशय धोकादाय पद्धतीने आपला जीव धोक्यात घालून हा जीवघेण्या स्वरूपाचा पूजा विधी पार पडण्याचा अट्टाहास सुरु असताना दिसून येत आहे.

तर दुसरीकडे पाणी पातळीत वाढ झाली कि, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात येते मात्र हा सर्व प्रकार घडत असताना प्रशासन डोळे घट्ट मिटवून बसलं होत. त्यामुळे या प्रकारावर पोलिसांनी Police आणि प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी अशी मागणी करण्यात येत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Awareness : चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीवर पाणी शिंपडणे पडू शकतं महागात, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गोव्यात सभा

Naag or Naagin : नाग की नागीण? कसं ओळखाल?

Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

Baramati : बारामतीत भीषण दुर्घटना! विहिरीच्या खोदकामावेळी दडी कोसळून 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT