Sharad Pawar’s statement on NCP merger reignites political debate after Ajit Pawar’s demise. Saam Tv
महाराष्ट्र

अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, ही माझी इच्छा, विलीनीकरणावर पवारांचं विधान, राष्ट्रवादी विलिनीकरणात तटकरे, पटेलांचा खोडा?

Sharad Pawar Statement On NCP Merger After Ajit Pawar Death: दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण ही अजित पवारांचीच इच्छा होती, असं वक्तव्य करुन शरद पवारांनी खळबळ उडवून दिलीय...मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात कोण खोडा घालतंय.. आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर दादांच्या राष्ट्रवादीतच कसे दोन मतप्रवाह आहेत..पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

ऐकलंत... अजित पवारांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला जोर आलाय.. खुद्द शरद पवारांनीच अजित पवारांसोबत विलीनीकरणाबाबत बैठका झाल्याचा गौप्यस्फोट केलाय.. एवढंच नाही तर शरद पवारांनी थेट विलीनीकरणाची ठरलेली तारीखही जाहीर केली...

खरंतर महापालिका निवडणुकीच्या आधी अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या... त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा अधूनमधून रंगायची... त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची झालेली आघाडी....विशेष म्हणजे 17 जानेवारीला बारामतीत विलिनीकरणाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार, अमोल कोल्हे यांची उपस्थिती होती. एवढंच नव्हे तर यासंदर्भात अजित पवार घरी येऊन भेटून गेल्याचा दावाही जयंत पाटांनी केला.

याच राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर मात्र दादांच्या पक्षातच मतभेद असल्याचं समोर आलंय.. सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांनी दोन्ही पवार एकत्र यायले हव्यात, अशी दादांची इच्छा असल्याचं म्हटलंय.. तर तटकरेंनी ही चर्चाच फेटाळून लावलीय...

अजित पवारांच्या मृत्यूनंतर विलीनीकरणाच्या इच्छेचं प्रकरण इथंच थांबलं नाही... त्यात आता ठाकरेंच्या सेनेनंही उडी घेतलीय... दादांच्या नंतर विलीनीकरणाची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचं राऊतांनी म्हटलंय..

दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण व्हावं, ही कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी पक्षावर वर्चस्वाचा मुद्दा आणि सत्तेच्या स्पर्धेमुळे अजित पवारांच्या मृत्यूनंतर तरी विलीनीकरणाचं दादांचं स्वप्न पूर्ण होणार की अपूर्णच राहणार...याकडे राज्याचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ T20: वनडेचा स्कोअर टी २० सामन्यात; न्यूझीलंडची कडक धुलाई, भारताच्या धुरंधरांनी पराभवाचा वचपा काढला

उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला घाई का? शरद पवार म्हणतात 'शपथविधीची माहिती नाही

Maharashtra Live News Update: डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; दुचाकी चालक जखमी

फेब्रुवारी महिन्यापासून अच्छे दिन सुरू; ५ राशींच्या लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होणार

अस्थिविसर्जनानंतर अवघ्या 24 तासांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; दिवसभरात राजकीय चक्रे कशी फिरली?

SCROLL FOR NEXT