Sunil Tatkare Saam Tv News
महाराष्ट्र

Sunil Tatkare: मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतूककोंडीवरून सुनिल तटकरे आक्रमक; थेट अधिकाऱ्यांची कानउघडणी

Sunil Tatkare orders action against officials: मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणामध्ये माणगाव येथील काळ नदी आणि गोद नदीवरील पुलाचे काम संथ गतीने सुरु असल्याने तटकरे संतापले.

Bhagyashree Kamble

मुंबई गोवा महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खासदार सुनिल तटकरे यांनी दिले आहेत. काळ नदी आणि गोद नदीवरील पुलाचे काम संथ गतीने सुरु असल्यानं सुनिल तटकरे संतापले. वाहतूक कोंडी आणि नागरीकांना होणारा नाहक त्रास, या प्रकरणी नागरीकांनी संतप्त भूमिका मांडली यानंतर सुनिल तटकरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरी करणामध्ये माणगाव येथील काळ नदी आणि गोद नदीवरील पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. ज्यामुळे सुनिल तटकरे संतापले असल्याची माहिती आहे. माणगाव बायपासचे रखडलेले काम आणि माणगावमधील वाहतूक कोंडी, यामुळे नागरीक त्रस्त आहेत. या कोंडीच्या होणार्‍या त्रासाला कंटाळून नागरीकांनी आक्रमक भूमिका मांडली. नागरीकांनी भूमिका मांडल्यानंतर सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केलीय.

एक जूनपर्यंत रस्ता पूर्ण न केल्यास संबधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर सदोश मनुष्यवधासह नागरीकांना त्रास होत असल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अशा पद्धतीने तटकरे यांनी अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले आहे.

या बैठकीला रायगडचे सहाय्यक पोलिस अधिक्षक अभिजित शिवतारे, माणगाव प्रांताधिकारी संदिपान सानप, तहसिलदार दशरथ काळे आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT