Mahendra Dalvi statement on Sunil Tatkare saam tv
महाराष्ट्र

सुनील तटकरे यांचं राष्ट्रवादीतील स्थान डळमळीत झालंय; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Politics: रायगडच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेतील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे यांचं राष्ट्रवादीतील स्थान डळमळीत झाल्याचा दावा आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.

Omkar Sonawane

रायगडच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेतील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात नवरात्रीनंतर मेळावा घेण्याची घोषणा केली. या घोषणेचा शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार समाचार घेत तटकरे यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. घारे, ओझर्डेंपेक्षा मातब्बर नेते आमच्याकडे आहेत. तटकरे यांचं राष्ट्रवादीतील स्थान डळमळीत झालं आहे. ते स्थिर करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा हल्लाबोल महेंद्र दळवी यांनी केला. रायगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचंही दळवी यांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा एकाच खेळीमध्ये दोन राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी आज आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुनील तटकरे यांनी ओझर्डे यांचं पक्षात स्वागत केलं.

सोमनाथ ओझर्डे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे महाडच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. याआधी कर्जत विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आता महाडमध्ये भरत गोगावले विरुद्ध सोमनाथ ओझर्डे असा नवा संघर्ष उभा राहणार का, याकडे रायगडच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

तटकरे यांनी ओझर्डे यांना पक्षात घेतल्यानंतर गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. त्याला महेंद्र दळवी यांनी दिलेलं आक्रमक प्रत्युत्तर पाहता *रायगडमध्ये आगामी काळात शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय सामना आणखी रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra : पावसाच्या सरींमध्ये खुलून दिसतात महाराष्ट्रातील 'ही' सुंदर ठिकाणं, मान्सून संपण्यापूर्वी नक्की फिरा

Bluetooth Hacking : तुम्ही सुद्धा Bluetooth ऑन ठेवताय? पण ही चूक पडू शकते महागात , तुमचा फोन होऊ शकतो हॅक

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाची दहीहंडी महायुतीच फोडणार: खासदार धनंजय महाडिक

Badlapur: बदलापूरमध्ये धबधब्यावर गेलेल्या तरुणीचा मृत्यू , पाय घसरून पाण्यात पडली अन्...

Mamata Banerjee FIR : ममता बॅनर्जींविरोधात गुन्हा; आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT