Baramati By-Election Saam Tv
महाराष्ट्र

Baramati By-Election: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार ठरला, कोण लढवणार निवडणूक?

Sunetra Pawar: अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे.

Priya More

Summary -

  • अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होणार

  • बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार ठरला

  • राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

  • निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांचा प्रयत्न

साम टीव्ही ब्युरो

अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची सूत्र नेमकी कोणाच्या हाती जाणार? याकडे लक्ष लागलेलं असताना राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत निर्णय झालाय. बारामतीची धुरा कोणाकडे जाणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

गेल्या तीन दशकांपासून बारामती आणि अजित पवार हे राज्याच्या राजकारणातलं रूळलेलं समीकरण. बारामतीचा विकास आणि 'शब्द दिला की तो पाळणारच' ही दादांची ओळख बारामतीकरांनी जवळून अनुभवली. मात्र अजितदादांच्या अकाली एक्झिटनं बारामतीचा 'कारभारी' हरपला आणि संपूर्ण तालुक्यात पोरकेपणाची भावना निर्माण झाली.

नियतीचा घाव सोसून आता त्याच बारामतीला पुन्हा उभं करण्यासाठी पवार कुटुंबिय पुढे सरसावलयं. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालयं. बारामतीचा हा नवा 'पॉवर' प्लॅन नेमका कसा असणार आहे? पाहुयात...

बारामती विधानसभेची पोटनिवडणुक सुनेत्रा पवार लढवणार आहेत. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाला. पार्थ पवार राज्यसभेवर जाण्याची चर्चा होत आहे. २६ फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची घोषणा होणार आहे. सुनेत्रा पवारांची 'राष्ट्रीय अध्यक्ष' म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.

अजितदादांच्या निधनानंतर पक्षातील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्विकारलं. मात्र उपमुख्यंत्री पद कायम ठेवण्यासाठी 6 महिन्याच्या आत निवडून येणं गरजेच आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार बारामतीच्या आखाड्यात उतरणार आहेत. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीचा भर ही निवडणुक बिनविरोध करण्यावर आहे. बारामती हा अजितदादांचा अभेद्य गड मानला जातो. आता सुनेत्रा पवारांना विधानसभेत पाठवून बारामतीतला 'पवार' नावाचा दबदबा कायम ठेवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT